नवी दिल्ली : भारतातील पहिल्या कंडोमोलॉजी सर्व्हेक्षणातून धक्कादायक खुलासे झाले आहेत. यानुसार 20 ते 24 वयोगटातील 80 टक्के तरुण लैंगिक संबंधांच्या वेळी निरोध (कंडोम) वापरत नसल्याचं समोर आलंय. याचा संबंधित तरुणांच्या आणि त्यांच्या एकूणच आरोग्यावर घातक परिणाम करेल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
खाद्यतेलावरील आयात करात कपातीचा निर्णय पुढे ढकला https://t.co/BYNV1T5S7D
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
भारतातील अर्धी लोकसंख्या ही 24 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांची आहे. याशिवाय 35 वर्षांखालील तरुणांचं लोकसंख्येतील प्रमाण तब्बल 65 टक्के आहे. या तरुणाचा अचूक उपयोग करुन देशाच्या विकासात त्यांना सहभागी करुन घ्यायचं असेल तर त्यांचं आरोग्य हा ऐरणीचा प्रश्न आहे. विशेषतः त्यांची भावी पिढी निरोगी राहण्यासाठी त्यांचं प्रजनन आरोग्य हा कळीचा मुद्दा आहे.
कंडोमोलॉजी हा शब्द कंझ्युमर (ग्राहक), कंडोम (निरोध) आणि सायकोलॉजी (मानसशास्त्र) या तीन शब्दांपासून बनलेला आहे. म्हणजेच या सर्वेत या तीनही मुद्द्यांवर अभ्यास करण्यात आलाय. भारतातील तरुणांचं लैंगिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बाजारपेठेतील कंडोम उत्पादक, पुरवठादार यांच्या ‘कंडोम अलायन्स’कडून हा अभ्यास करण्यात आलाय. कंडोमचा वापर न केल्यानेच भारतात अनियोजित गर्भधारणेच्या अनेक घटना, असुरक्षित गर्भपाताच्या मार्गाचा उपयोग आणि लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांचं प्रमाण अधिक असल्याचंही उघड झालंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सिंगलच बरं आहे, काहीही झालं तरी लग्न नकोच – तुषार कपूर https://t.co/JXQJQwmsuj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
* जनजागृती आणि प्रबोधन करणे गरजेचे
भारतात 20 ते 24 वयोगटातील बहुतांश तरुणांकडून कंडोमचा वापर नाही. अहवालात 20 ते 24 वयोगटातील बहुतांश तरुणांनी लैंगिक संबंधांवेळी कंडोमचा वापरच केलेला नसल्याचं समोर आल्यानं याबाबत जनजागृती आणि प्रबोधन करणं गरजेचं असल्याचं नमूद केलंय. असं केलं तरच लैंगिक आरोग्य आणि सुरक्षित गर्भधारणा होईल. अन्यथा भारतातील या तरुणांना या पातळीवर मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे.
राहुल गांधींनी एकाच दिवशी ट्विटरवर 'या' लोकांना केलं अनफॉलो https://t.co/kutqTQYAXG
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
* अहवालातील धक्कादायक खुलासे काय?
भारतातील केवळ 7 टक्के महिला आणि 27 टक्के पुरुष लग्नाआधीच्या लैंगिक संबंधाच्या वेळी कंडोम वापरतात. दुसरीकडे केवळ 3 टक्के महिला आणि 13 टक्के पुरुष नियमितपणे लैंगिक संबंधांच्या वेळी कंडोम वापरतात. ही सर्व आकडेवारी 2014-15 मधील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणातही (NFHS) पाहायला मिळाली होती. कंडोम वापराबाबत जनजागृतीसाठी अनेक प्रयत्न होऊनही भारतातील कंडोम मार्केटमधील वाढ मागील अनेक वर्षांपासून केवळ 2 टक्के इतकी आहे. दुसरीकडे एचआयव्ही (HIV) संसर्गात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो.
लसीअभावी मुंबईत आज कोरोना लसीकरण बंद #surajyadigital #coronavaccin #mumbai #मुंबई #सुराज्यडिजिटल #Stop pic.twitter.com/q6IvIh5Opk
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021