सोलापूर / पंढरपूर : आषाढी यात्रेच्या सोहळ्यादरम्यान देखील विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंदच राहणार आहे. मात्र श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ऑन लाईन पध्दतीने 12 जुलैपासून (प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत) भाविकांना २४ तास घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
कोरोनामुळे लोकप्रियता कमी झाली असली तरी पुन्हा मोदीच सत्तेत येणार, वाचा असा कोणाचा आहे दावा ? https://t.co/vZpUiBcX1n
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पंढरपूर येथील भक्त निवास मध्ये संपन्न झाली. यानंतर समितीचे सहअध्यक्ष ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सदस्य संभाजी शिंदे, ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, नगराध्यक्षा साधना भोसले उपस्थित होत्या. 20 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्र्यांना या महापूजेसाठी निमंत्रण देण्याचा निर्णय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
भारतातील लोकांचं 'कंडोम' वापरण्याचं प्रमाण कमी, अहवालातील धक्कादायक खुलासेhttps://t.co/tVJ9YE3Sx7
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांना कसल्याही प्रकारची अडचण निर्माण झाल्यास त्यांच्या अडचणी सोडवून वारकऱ्यांची सोयी सुविधा उपलब्ध देण्यासंदर्भात मंदिर समिती तयार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.
पुढे औसेकर म्हणाले, मानाचे नैवेद्य आहेत, त्या सर्वांना देवाला मानाचा नैवेद्य दाखवण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्यांच्या पादुका व पालखी भेटी ठरलेल्या आहेत, त्या भेटी घडवण्यात येणार आहे. मानाचे वारकरी, दिंडीकरी व मानाची महाराज असे 195 मंडळींना देवाचे दर्शन देण्याचे ठरवण्यात आले आहे. पंढरपुरातील फडकरी व येणाऱ्या दिंड्यांना नगरप्रदक्षिणा करण्यासाठी व पांडुरंगाच्या रथाला देखील विठ्ठल मंदिराला प्रदक्षणा करण्याची परवानगी देण्यात आले आहे.
खाद्यतेलावरील आयात करात कपातीचा निर्णय पुढे ढकला https://t.co/BYNV1T5S7D
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 3, 2021
* उत्पन्न वाढीसाठी देवाच्या प्रतिमा तयार करून विक्री
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून विठ्ठल – रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. परिणामी मंदिर समितीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाउनमुळे पंढरपूर येथील श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. यावर पर्याय म्हणून मंदिर समितीने उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयत्न सुरू केले आहेत.
महिला शास्त्रज्ञांची कमाल; प्रयोगशाळेत तयार केले आईचे दूध, येत्या तीन वर्षात हे दूध बाजारात उपलब्ध होईल https://t.co/0iCEEAQ3d4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021
याचाच एक भाग म्हणून मंदिर समितीने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिमा तयार करून त्यांची विक्री करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. देवाच्या विविध 31 रूपातील आणि पोषाखातील सुमारे 72 हजार प्रतिमा तयार केल्या आहेत. एकूण सहा प्रकारांमध्ये देवाच्या प्रतिमा तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 500 प्रतिमा तयार केल्या आहेत. समितीच्या या उत्पन्न वाढीच्या नव्या उपक्रमाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. पाचशेहून अधिक प्रतिमांची नोंदणी झाली आहे.
राहुल गांधींनी एकाच दिवशी ट्विटरवर 'या' लोकांना केलं अनफॉलो https://t.co/kutqTQYAXG
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 2, 2021