मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का? याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत ‘परमेश्वरालाच ठाऊक’ असं उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंना यासंदर्भात प्रश्न करण्यात आला. यावर ‘ज्या गोष्टी परमेश्वराला माहिती असतील, त्या मला माहिती असणं शक्य नाही’, असं उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं.
मोठी गुडन्यूज – महाराष्ट्रात मान्सून दाखल, पाऊस बरसणार, शेतीच्या पुढील नियोजनासाठी पहिला पाऊस महत्त्वाचा https://t.co/c9iJDvasSv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
उद्धव ठाकरे म्हणाले,”पक्षीय राजकारणापेक्षा लोक जगणं महत्त्वाचं आहे. करोनामुळे अनेकाच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नवीन नोकऱ्या कधी मिळतील सांगता येत नाही. करोना किती काळ राहिल सांगता येत नाही. त्यामुळे आपलं आयुष्य हीच प्रत्येकाची प्राथमिकता असायला हवी. आणि ती आहे. जर मला सत्ता कशासाठी पाहिजे, हा विचार स्पष्ट नसेल, तर सत्ता देणारी लोक माझ्याविरोधात जातील. सत्ता मिळवायची म्हणून मिळवली आणि या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही, तर देश अराजकतेकडे जाईल. चाललेला आहे. यात लोक पक्ष बघणार नाहीत. तुम्हाला मत दिलं होतं, तुम्ही मला जे आश्वासन दिलं होतं, ते द्या, असं लोक म्हणतील. माझ्यामते करोना ही धोक्याची घंटा आहे. ती सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या डोक्यात वाजली पाहिजे. ती न वाजता आपण एकमेकांवर आरोप करत बसलो. लोकांकडे दुर्लक्ष केलं, तर मग देशात अराजक येईल,” असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
…तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार टिकेल : उद्धव ठाकरे https://t.co/MFwfOQMeXp
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
“ज्या गोष्टी परमेश्वरला माहिती आहे. त्या मला माहिती असणं शक्य नाही,” असं मिश्किल भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं. पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,”देशासाठी, राज्यासाठी आताच्या घडीला जे एकत्र येऊ शकत असतील त्यांनी यावं. ज्यांची ज्यांची जी काही ताकद आहे, ती एकवटावी. कारण हे संकट साधंसुधं नाहीये. या संकटात आपण एकत्र आलो नाही, तर देशात अराजक येणार.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे माझं भाकीत नाहीये, ही माझी भीती आहे. कारण लॉकडाउन किती काळ ठेवावा लागेल, सांगता येत नाहीये. जीव वाचला, तर सगळं वाचणार आहे. माझी प्राथमिकता जीव वाचवण्याची आहे. सगळं चालू ठेवलं आणि कर्ता पुरुष गेला, तर अर्थचक्राला काय अर्थ आहे. त्यामुळे या विचारासाठी जे एकत्र येऊ शकत असतील, त्यांनी यावं आणि राजकारण थांबवावं,” असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं.
महाराष्ट्रासाठी मोठी आनंदाची बातमी, 3 महिन्यात पहिल्यांदाच कोरोनामुक्तीचे प्रमाण 95 टक्क्यांवर https://t.co/v3go1qmxQG
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
याविषयी संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी राज ठाकरे यांना चिमटा काढला. परमेश्वर हा कुठल्याही पक्षाचा मेंबर नसतो, तो कधीच मध्यस्थाची भूमिका घेत नाही. त्यामुळे अशा गोष्टी या परमेश्वरावर सोडून द्यायच्या नसतात. जो परमेश्वरावर विसंबून राजकारण करतो त्याला स्वत: परमेश्वरही मदत करत नाही. राजकारण हे आपलं आपण करायचं असतं, असे संजय राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांच्या या तिखट भाषेतील टीकेला ‘मनसे’कडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीचा गोंधळ संपला! मध्यरात्री निघाले आदेश; पाच टप्प्यात हटणार लॉकडाऊनचे निर्बंध
https://t.co/iSVF3cgOZW— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
शिवसेना खासदार अरविंद सावंत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलत होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का हा प्रश्न आपल्याला आशावादी वाटत नसल्याचे सांगत त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. आता राज ठाकरे यांना असा प्रश्न का विचारण्यात आला आणि राज ठाकरे यांनी तसे उत्तर का दिले याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे सांगत या प्रश्नाबाबत त्यांनी संदिग्धता व्यक्त केली. आता या प्रश्नावर फक्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच बालू शकतील असे स्पष्ट करत त्यांनी या मुद्द्यांला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाजकारणात आण राजकारणात काहीही घडू शकते हे बोलायलायही सावंत विसरले नाहीत.
मोदी सरकार आणि ट्विटरमध्ये पुन्हा नवा संघर्ष पेटण्याची शक्यता https://t.co/NsL5kTPyCv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021