नवी दिल्ली : टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकची तयारी जोरदार सुरू आहे. परंतू या स्पर्धेवर कोरोनाचं संकट आहे. त्यातच ऑलिम्पिक परंपरेनुसार खेळात भाग घेणाऱ्या खेळाडूंना मोफत कंडोम देण्यात येणार आहे. 1,60,000 कंडोमचे वाटप करण्यात येणार आहे. पण आयोजकांनी स्पर्धा सुरू असलेल्या ठिकाणी खेळाडूंना कंडोमचा वापर करण्यास मनाई करण्यात आली. खेळाडूंना ऑलिम्पिकची आठवण म्हणून हे कंडोम घरी घेऊन जायचे असल्याचे आयोजकांनी सांगितलं.
व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर बंद? अखेरची नोटीस https://t.co/1d82e8vJfh
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 5, 2021
2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या जवळपास 11,000 खेळाडूंना प्रत्येकी 14 कंडोम ऑलिम्पिक समितीकडून मिळणार आहेत. अर्थात जुने नियम आणि परंपरा ही कोरोना महामारीच्या आधीच्या काळातील आहेत. आता जागतिक अभियानाअंतर्गत कोरोनाला आळा घालण्यासाठी खेळाडूंनी एकमेकांनी कमीत कमी संपर्क ठेवावा अशी सूचना ऑलिम्पिकचे आयोजक खेळाडूंना करत आहेत. ऑलिम्पिक समितीने आपल्या कंडोम कार्यक्रमाची घोषणा करताना 33 पानांचे एक प्लेबुकदेखील प्रसिद्ध केले आहे. यामध्ये शारीरिक संपर्क टाळण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चिमणी गिधाडांना भारी पडली ! https://t.co/h5B9CbOkAw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
ऑलिम्पिक म्हटले की खेळांचा महाउत्सवच असतो. विविध खेळांशी संबंधित अनेक मुद्दे या काळात चर्चेत असतात. पण ऑलिम्पिकसंदर्भातील आणखी एक खास परंपरा आहे. ऑलिम्पिकच्या परंपरेनुसार ज्या गावात किंवा परिसरात ही स्पर्धा पार पडते तिथे राहणाऱ्या आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडू किंवा अॅथलीटना स्पर्धेच्या काळात मोफत कंडोम दिले जातात. मोफत वाटले जाणाऱ्या कॉन्डोमची संख्या थोडीथोडकी नव्हे 1,60,000 कंडोम इतकी आहे. अर्थात यासंदर्भात एक अडचणदेखील आहे.
एचआयव्ही एड्स आणि लैंगिक आजारांना आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 1988 पासून खेळांदरम्यान कंडोमचे वाटप करण्याची प्रथा सुरू केली. अर्थात मागील ऑलिम्पिकच्या तुलनेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कमी कंडोमचे वाटप केले जाणार आहे. याआधीच्या रिओ ऑलिम्पिकच्या काळात ऑलिम्पिक समितीने 4,50,000 कंडोमचे वाटप केले होते.
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा….!#surajyadigital #छत्रपती #Chatrapatishivajimaharaj #सुराज्यडिजिटल #शिवराज्याभिषेक #ShivRajyabhishek pic.twitter.com/dGjGfNTQ8f
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021
आयोजकांनी खेळ गावात ॲथलीट किंवा खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मोफत कंडोमच्या वापराला मनाई केली आहे. आयोजन समितीचे म्हणणे आहे की खेळाडू ऑलिम्पिकची आठवण म्हणून हे कंडोम घरी आपल्या देशात घेऊन जायचे आहेत. जपानमध्ये खेळाडूंनी या मोफत दिलेल्या कंडोमचा वापर करण्यास मनाई केली आहे. खेळाडूंनी आपल्या देशात गेल्यावर याचा वापर करावा अशी आयोजन समितीची भूमिका आहे. आयोजकांनी ही भूमिका घेण्यामागे कारण आहे कोरोना महामारीचे. खेळाडूंनी जर कंडोमचा वापर केला तर ते इतरांच्या संपर्कात येऊ शकतात. त्यामुळे कोरोना महामारीचा फैलाव होऊ शकतो. कोरोना महामारीच्या काळात एकमेकांशी संपर्क टाळायचा आहे. त्यामुळे खेळाडूंनी खेळ गावात या कंडोमचा वापर करू नये असे आयोजन समितीचे म्हणणे आहे.
अभिनेता संजय दत्तने घेतली गडकरी आणि नितीन राउतांची भेट https://t.co/nM4F1BzGQ2
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 6, 2021