नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लसीकरण सुरू आहे. अशातच २१ जूनपासून देशात सर्वांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी लसीचे दर निश्चित केले आहेत. नवीन दरानुसार कोव्हिशिल्डची किंमत ७८० रुपये प्रति डोस तर कोव्हॅक्सिनची किंमत प्रति डोस १४१० रुपये असेल. रशियाची स्पुतनिक-व्हीची किंमत ११४५ रुपये असणार आहे. या दरांमध्ये जीएसटी आणि सेवाशुल्क यांचाही समावेश असणार आहे.
या दोन मोठ्या बँकांवर आरबीआयची कारवाई, ठोठावला 6 कोटींचा दंड, अहवालात निष्काळजीपणाचा ठपकाhttps://t.co/vQYd2ei2ZY
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली होती. देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार असून केंद्र सरकारने याआधी राज्य सरकारांना दिलेली जबाबदारी आपल्याकडे घेतली आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले होते. त्यामुळे देशातील कोरोना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात सुरू असलेल्या गोंधळावर एकदाचा पडदा पडणार असे दिसते आहे. एकूण लशींपैकी ७५ टक्के लशी भारत सरकार विकत घेऊन त्या नागरिकांना मोफत देणार आहे.
यापुढे लसीकरणासाठी राज्य सरकारांना पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले होते. तर खासगी हॉस्पिटल ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त नफा कमावू शकणार नाहीत.
Corona vaccine rate list update!!@covidpatienthd @digvijaya_28 @CollectorBhopal @BhopalDivision @MirchiBhopal @smritiirani @MoHFW_INDIA #Covid19IndiaHelp #COVIDSecondWave #coronavirus #BlackFungus #mucormycosis #blackfungusalarm pic.twitter.com/j7xAjbAxS2
— CPHD FOUNDATION, INDIA (@covidpatienthd) June 8, 2021
देशातील एकूण लसीकरणातील २५ टक्के लसीकरण खासगी हॉस्पिटलमार्फत केले जाणार असल्याचेही मोदींनी सांगितले होते
आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोविशील्ड , कोव्हॅक्सीन आणि स्पुटनिक व्ही या कोरोना लशींची खासगी हॉस्पिटलने आकारायची किंमत जाहीर केली आहे. अधिकृत कोरोना लसीसाठी प्रत्येक डोससाठी किती किंमत असणार, त्यावर सेवाशुल्क किती आकारले जाणार याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीच्या प्रत्येक डोससाठी ५ टक्के जीएसटी आणि कमाल १५० रुपये सेवाशुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातही कोविशील्डसाठी जीएसटी शुल्क ३० रुपये, कोव्हॅक्सीनसाठी ६० रुपये आणि स्पुटनिक व्ही साठी ४७ रुपये निश्चित करण्यात आले आहे.
जगभरातील इंटरनेट काही काळासाठी ठप्प https://t.co/ssACGqMktO
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021
कोरोना लस उत्पादक कंपनी लशीच्या डोसची किंमत बदलण्यापूर्वी ते जाहीर करणार आहे आणि किंमतीतील तो बदल आधीच नागरिकांना सूचित करण्यात येणार आहे. खासगी हॉस्पिटल प्रत्येक डोससाठी जास्तीत जास्त १५० रुपये सेवा शुल्क आकारू शकतील. राज्य सरकारांनी कोरोना लसींच्या किंमतीवर देखरेख करायची आहे, असे आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
कोविन वेबसाईटवर लसीकरण केंद्र कमाल शुल्कापेक्षा जास्त किंमत वसूल करत नाहीत ना याची माहिती मिळणार आहे. कोरोना लशीसाठीची किंमत सरकारने औषध निर्मिती कंपन्यांनी प्रति डोस जाहीर केलेल्या उत्पादन खर्चाच्या आधारावर निश्चित केली आहे. भविष्यात औषध निर्मिती कंपन्यांनी त्यांच्या किंमतींमध्ये बदल केल्यास कोरोना लशीच्या किंमतीत त्यानुसार बदल केला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रशासित प्रदेश आणि राज्य सरकारांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या कोरोना लसींच्या किंमतीवर देखरेख करायची आहे.
जीन्स घालाल, विदेशी चित्रपट पाहाल तर मृत्यूदंड https://t.co/5Aq8Nu8S0u
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021
१८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देताना राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांनी कोरोना लसीकरण कार्यक्रमाचा प्राधान्यक्रम ठरवायचा आहे. नवीन नॅशनल कोविड व्हॅक्सीनेशन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना २१ जूनपासून लागू होणार आहेत. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांनी कोरोना लसीची नासाडी टाळावी, जेणेकरून लशीच्या पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार नाही, अशी सूचनाही केंद्र सरकारने केली आहे.
मोठा गाजावाजा करत सुरु केलेली आयकर विभागाची नवी वेबसाईट 'क्रॅश' https://t.co/yT3Df6CfSt
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021