सोलापूर : गुन्हे शाखा, सोलापूर शहर गुन्हे शाखेेने रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा टाकून अश्लिल व विभत्स नृत्य करणाऱ्या ८ नृत्यांगना, व त्यांच्यावर पैसे उधळणाऱ्या २९ इसमांना ताब्यात घेतले.
आषाढी वारीसाठी 10 महत्त्वाच्या पालख्यांना परवानगी, 20 बसमधून येणार मानाच्या 10 पालख्या https://t.co/Juy9rLG9ke
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
या छाप्यातील कारवाईमध्ये सुमारे ४८लाख,९८ हजार,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर अॉनलॉक होताच धनदांडगे आणि गब्बर गंड पैसे उधळण्यासाठी कसा मार्ग काढतात यावर शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे व त्यांच्या पथकाने कारवाई केली.
सध्या कोविड-१९ संसर्गजन्य रोगाचे अनुषंगाने जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा शिवाजी नगर बाळे येथील हॉटेल पॅराडाईजचे मालक बाबा जाफर पठाण हा त्याचे हस्तक संजय पोळ व मॅनेजर मुकेशसिंग बायस यांचेकरवी हॉटेल पॅराडाईज ऑर्केस्ट्राबार चालवित होता.
अलर्ट! महाराष्ट्रासाठी पुढचे 3 दिवस धोक्याचे https://t.co/0nZ01DthND
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकऱ्यांनी कृषी योजनांचा लाभ घ्यावा, पालकमंत्री भरणे यांचे आवाहन https://t.co/NSHLFwSqCp
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
सदर डान्सबारमध्ये महिला अर्धनग्न अवस्थेत डान्स करुन अश्लिल हावभाव करुन डान्स करीत व काही इसम त्यांचे अंगावर चलनी सदृश्य नोटा उधळून त्यांचे अंगाला स्पर्श करीत आहेत. अशी खात्रीलायक मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन ही छाप्याची कारवाई केली.ऑर्केस्ट्राबारमध्ये आलेल्या ग्राहकांना विनापरवाना मदय पुरविल्याचे कारवाईत निष्पन्न झाले.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संजय साळुंखे, पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, निखिल पवार ,संदीप शिंदे, शैलेश खेडकर , फौजदार सुहास आखाड यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल महिला पोलीस कॉन्स्टेबल पोलीस होमगार्ड या पथकाने ही कामगिरी पार पडली.
आदेश ! कोरोना लस न घेतल्यास सिम कार्ड बंद होणार https://t.co/4lOipb8Bjv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
* यांच्यावर गुन्हा दाखल
पोलीसांनी येथून संजय पोळ (वय-४१ वर्षे, सैफुल, सोलापूर) मुकेशसिंग बायस (वय-४७ वर्षे, , वसंतविहार सोलापूर), अजिंक्य अशोक देशमुख (वय-३०, रा, रमण नगर, अक्कलकोट रोड), मयुर लक्ष्मण पवार (वय-३५, .देवणी, जि.लातूर), विजय शिवशंकर तिवारी (वय-४७, रा-, कलबुर्गी, कर्नाटक), विशाल राजेंद्र कोळी (वय-२६, रा-कृष्णा नगरी, सैफुल ) ,नितिन आप्पासाहेब सासणे (वय-३४, रा-जय मल्हार नगर, बाळे), गोपाळ बाबु जाधव (वय-४८, रा-सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.६) गोपाळ बाबु जाधव (वय-४८, रा-सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.६), सुधाकर संदिपान माने (वय-२७, रा कोंडी),
श्रीकांत प्रल्हाद शिंदे (वय-२२, , गुळवंची), आकाश गणेश कांबळे (वय-२७, रा-बुधवार पेठ, मिलींद नगर), मारूती केत (वय-३७, रा मुळेगाव तांडा), रजनिश भोसले (वय-३४, रा. जोशी गल्ली), सचिन सुरेश जाधव (वय-३५, , दमाणी नगर) , अमर देविदास जमादार (वय-२७,रा- जुनी मिल चाळ), आकाश गुरव (जुना पुना नाका), दीपक सुंदर सिंग चव्हाण (भूषण नगर) प्रकाश वाघमारे (सात रस्ता सोलापुर) ,पुरुषोत्तम बने (उत्तर कसबा सोलापूर), अमिताब वाघमारे (सिद्धार्थ हौसिंग सोसायटी), प्रसाद लोंढे (अवंती नगरी), प्रवीण कुमार शिंदे (विजापूर), प्रशांत गायकवाड (विजापूर रोड सोलापूर), प्रभाकर फताटे (अक्कलकोट रोड सोलापूर), राजकुमार कडबगाव (अक्कलकोट), निसार मुजावर (भवानी पेठ), संतोष कदम (शेळगी) अशा 24 जणांविरोधात व मिळून आलेल्या ८ नर्तिका यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
टायर फुटून अपघात, लातूरच्या दोघांचा मृत्यू, एक जखमी
https://t.co/GAzCKba1Ho— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021