नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. त्यातच आता संयुक्त किसान मोर्चाने मोठी घोषणा केली. शेतकरी २६ जूनला विरोध प्रदर्शनावेळी विविध राज्यांमधील राजभवनाबाहेर निदर्शने करतील व काळे झेंडे दाखवतील. तर, संयुक्त किसान मोर्चा प्रत्येक राज्याच्या राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठवेल, असं ऑल इंडिया किसान सभेचे इंद्रजित सिंग यांनी सांगितलं.
Samyukta Kisan Morcha will organise protests outside Raj Bhawans across the country on June 26, when our agitation against three farm laws completes 7 months. The day will be observed as Kheti Bachao, Loktantra Bachao Diwas: Inderjit Singh, All India Kisan Sabha, Haryana (11.06) pic.twitter.com/ZLznSTbzi0
— ANI (@ANI) June 12, 2021
हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील सुमारे ५० शेतकरी राजधानी दिल्लीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी राजधानीच्या सर्व सीमेवर बंदोबस्त वाढवला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. मात्र, अशी कोणतीही योजना नसल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
पाच वर्षे, त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालावे का ? रेमडेसिवीर, स्टेरॉइडचा वापर कधी https://t.co/rua8cWF1Ai
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसमोर निदर्शने केली जाणार आहेत. कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास या दिवशी सात महिने पूर्ण होत आहेत. या निमित्त ही निदर्शने केली जात आहेत.
अभिनेत्री, खासदार नुसरत जहांचा 'बेबी बंप' फोटो व्हायरल, पतीने बाप नसल्याचं केले जाहीर https://t.co/LAgSAuylGm
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
शेतकरी २६ जून रोजी विरोध प्रदर्शनावेळी विविध राज्यांमधील राज्यभवनाबाहेर निदर्शने करतील व काळे झेंडे दाखवतील. तर, संयुक्त किसान मोर्चा प्रत्येक राज्याच्या राज्यपालाच्या माध्यमातून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन पाठवेल. तसेच, हा दिवस शेती वाचवा, लोकशाही वाचवा दिवस म्हणून देखील पाळला जाणार असल्याचं ऑल इंडिया किसान सभेचे इंद्रजित सिंग यांनी सांगितले आहे.
बिल गेट्स आहेत अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी ? https://t.co/SccTatcDhe
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी संघटना यांच्यातील बोलणी जानेवारीपासून ठप्प झालेली असतानाच, या शेतकऱ्यांच्या कृषी कायद्यांना असलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी संवाद पुन्हा सुरू करण्याची तयारी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बुधवारी दाखवली. तथापि, हे कायदे रद्द करण्यात यावेत आणि किमान हमीभावांबाबत कायदेशीर खात्री द्यावी या मागण्यांवर शेतकरी संघटना अद्याप अडून आहेत.
सांगलीत एकाच झाडाला तब्बल 22 प्रकारचे देशी-विदेशी आंबे, झाड नव्हे, हा तर आंब्याचा मॉल
https://t.co/vGYjZ7uIe4— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021