अहमदनगर : कोपर्डी येथील सामुहिक बलात्काराच्या घटनेला आज ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. २०१७ मध्ये आरोपींनी फाशीच्या शिक्षेविरोधात हायकोर्टात धाव घेतली. तेव्हापासून हा विषय कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने विशेष खंडपीठाची स्थापना करून, या प्रकरणाचा येत्या सहा महिन्यात निकाल लावावा, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ते आज कोपर्डी येथे निर्भयाच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी गेले होते.
झेड दर्जाची सुरक्षा, ज्योतिरादित्यांचा ताफा अडवून दिले 'बेशरमा'ची फुले https://t.co/lecRiqo2a1
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
छत्रपती संभाजीराजे यांनी सामुहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कोपर्डीमधील निर्भयाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. सहा महिन्यात हे सर्व प्रकरण निकाली लागायला हवं. अशी मागणी संभीजाराजेंनी यांनी केली.
यावेळी संभाजीराजे म्हणाले की, “जे दोषी आहेत त्यांच्याबाबत काय निर्णय झाला आहे. हे सरकारला कानावर घालण्यासाठी देखील मी इथं आलो आहे. २०१७ मध्ये या आरोपींना शिक्षा झाली आणि नंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. एक कायदा असा सांगतो की, दोषी जे असतात त्यांना उच्च न्यायालयात अपीलसाठी दोन वर्षे संधी मिळते. म्हणून त्यांनी २०१९ मध्ये पुन्हा एकदा उच्च न्यायालयात अपील केली होती.
प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नव्हे, पेशवाईला फटका, भाजपची मोठी लिस्ट तयारhttps://t.co/j5oEOQCZlf
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पण २०१९ ते २०२० एक वर्ष होऊन गेलं व आजही ती केस प्रलंबितच आहे. मी इथं पीडितेच्या कुटुंबीयांना भेटलो, त्यांच्याही मनात आक्रोश होता. त्यांची एवढीच इच्छा होती की समाजाला न्याय मिळावा आणि आमच्या भगिनीला न्याय मिळावा. म्हणून माझी सरकारला हीच विनंती राहणार आहे, तुम्ही तत्काळ उच्च न्यायालयाला अर्ज करावा व त्यामध्ये तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे, विशेष खंडपीठ स्थापन केलं पाहिजे. विशेष खंडपीठाच्या माध्यमातून सहा महिन्यात हा केसचा निकाल लागला पाहिजे. इथून गेल्यानंतर हे मी ताबडोब मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.”
मराठा आरक्षणासाठी आता गुळगुळीत आंदोलन नको, मंत्र्यांच्या गाड्या फोडा, मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? https://t.co/4EruBnYNVt
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
तर, “२०१६ ला हा सामुहिक बलात्कार झाला. २०१७ ला ते दोषी असल्याचा निकाल लागला. आता २०२१ आहे. अजूनही पुढची कारवाई का झाली नाही? त्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी केली जात नाही. हे लक्षात घेता, आता राज्य सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून, सहा महिन्यांत हा विषय निकाली काढावा. या कुटुंबाला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.”, असं संभाजीराजेंनी कोपर्डी येथे जाण्या अगोदर बोलून दाखवलं होतं.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा झाली? राष्ट्रवादीचा खुलासा, पहा व्हिडिओhttps://t.co/boMdwxaLrW
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021