मोहोळ : मोहोळ पोलिसांनी रेशनचा तांदळाचा मालट्रक पकडला. यात पुरवठा विभागाच्या असहकार्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला. त्यामुळे तब्बल १५ दिवसांनंतर मोहोळ पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला.
सोलापुरातील हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा; ८ नृत्यांगना, २९ इसमासह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्तhttps://t.co/2ivv9yAFTw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
मोहोळ पोलिसांनी रेशनच्या तांदळाने भरलेला मालट्रक ( क्र. MH12EA1374 ) सावळेश्वर टोलनाक्याजवळ २८ मे च्या रात्री पकडला होता. यात रेशनच्या तांदळाने भरलेल्या वेगवेगळ्या कंपनीची नावे असलेल्या ४०० कट्टे होते. याबाबत गाडी सोबतचे ड्रायव्हर हरिदास माळी व महेश फडतरे यांनी हा तांदूळ सोलापूर येथील दयानंद कॉलेजच्या मार्गावरील पत्राशेडमध्ये असणाऱ्या कलबुर्गी यांच्या गोडावूनमधून भरला असल्याचे सांगीतले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा मालट्रक पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणून लावला होता. पुरवठा विभागाला तांदूळ रेशनचा आहे का ? याबाबतचा अहवाल मागीतला होता, पुरवठा विभागाने तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याकरता घेतले होते. परंतु याबाबत पोलिसांना कसलाच पत्रव्यवहार पुरवठा विभागाने केला नाही.
सोलापूर – मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांची सोलापुरात पत्रकार परिषद, आता मूकमोर्चा नव्हे निघणार संघर्ष मोर्चा #surajyadigital #मराठाआरक्षण #सुराज्यडिजिटल #MarathaReservation #Morchahttps://t.co/nYehiV3jY2
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
शेवटी पोलिसांनीच पुरवठा विभाग सहकार्य करण्यास असमर्थ ठरल्याने, पोलिस निरिक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून ट्रकचे ड्रायव्हर हरिदास माळी, क्लीनर महेश फडतरे ( दोघे रा. तुंगत ता. पंढरपूर ) गोडवूनचे मालक सादीक जावेद कलबुर्गी, वसीम शेख, अजहर कलबुर्गी अशा पाचजणावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा केला. या घटनेचा तपास पीएसआय राजकुमार डूनगे हे करीत आहेत.