सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत, केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत. परंतू महाविकास आघाडीला झुकविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आता आरक्षण मिळविण्यासाठी गुळगुळीत आंदोलन न करता राज्यभरात मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला.
देव तारी त्याला कोण मारी!; माळशेज घाटात काटा आणणारा अपघात, दोघांचा चहामुळे वाचला जीवhttps://t.co/yTltQ6gWKH
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
मराठा आरक्षण मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शनिवारी मराठा क्रांती संघर्ष मोर्चा संदर्भात अण्णासाहेब पाटील सांस्कृतिक सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, शहाजी पवार, अनंत जाधव, इंद्रजित पवार, राम जाधव, किरण पवार, राम जाधव, अजिंक्य पाटील, श्रीकांत घाडगे, सोमनाथ राऊत, शाम कदम यांच्यासह समाजातील युवकांची मोठी उपस्थिती होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जागतिक बालकामगार विरोधी दिवस #surajyadigital #child #childlabourday #बालकामगार #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/pKnBRhP9IK
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
ओबीसी समाजाचे नेते आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र येतात. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतील मराठा मंत्री मात्र तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? अशी टीका मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी केलीय. “ओबीसी समाजाचे नेते हे त्यांचे राजकीय आरक्षण किंवा पदोन्नतीमध्ये आरक्षण अडचणीत आल्यानंतर एकत्रित येतात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील मराठा मंत्री मात्र तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? अशी गंभीर टीका नरेंद्र पाटील यांनी केली. या मंत्र्यांना लाजा वाटत नाही का? नाहीतर किमान आम्ही मराठा नाहीत हे तरी जाहीर करा” असेही नरेंद्र पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान मराठा क्रांती संघर्ष मोर्चा हा आक्रमक असेल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी दिली.
मोहोळ पोलिसांनी पकडला रेशन तांदळाचा मालट्रक, पुरवठा विभागाच्या असहकार्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंबhttps://t.co/h0g1gPUivQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
”घरात बसून, काळे झेंडे दाखवून आंदोलन करायचे नाहीत. हे असे मिळमिळीत आंदोलन मराठ्यांचे नाहीत. एखाद्या मंत्र्याची गाडी आली तर दगड घालून त्याची काच फोडली पाहिजे.” असे विधान नरेंद्र पाटील यांनी केले. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी तरुणांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान इत्यादींना पत्र लिहावे, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. तसेच आरक्षणाच्या बाबतीत सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाच्या बाजूने उभे राहायला हवे असे मतही आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.
संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा, सर्व राजभवनांसमोर निदर्शने https://t.co/elQfKyculo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
* दि. बा. पाटील यांच्यापेक्षा मोठे नाव कुणाचे होऊ शकत नाही
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. नवी मुंबई, पनवेल, उरण या भागात एकाही मोठ्या प्रकल्पाला स्थानिक व्यक्तीचे नाव देण्यात आले नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांच्यापेक्षा मोठे नाव कुणाचे होऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिकांची मागणी रास्त असून शासनाने देखील याचा विचार करावा असे, मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
* …यांना का,घेऊन गेले नाहीत ?
मराठा आरक्षणप्रश्नासाठी पंतप्रधानांना भेटायला गेलेले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे किंवा छत्रपती उदनराजे यांना का घेऊन गेले नाहीत, असाही सवाल नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.
मी काही नवाझ शरीफांना भेटायला गेलो नव्हतो – उद्धव ठाकरे; विधानपरिषदेच्या 12 जागांचा प्रश्न पंतप्रधानांच्या कोर्टातhttps://t.co/EsXqWu7olF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 8, 2021
मुख्यमंत्री हे फक्त मराठा आरक्षणासाठी म्हणून भेटायला गेले नव्हते, तर ते १२ प्रकरणे घेऊन पंतप्रधानांना भेटायला गेले होते. यावरूनच महाविकास आघाडी किती आक्रमक आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सिध्द होते. महाविकास आघाडी सरकारने आयोगाची नेमणूक केली मात्र त्यात एकाही मराठा समाजाच्या व्यक्तींचा समावेश नसल्याचे सांगितले.