मुंबई : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली, असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं.
संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा, सर्व राजभवनांसमोर निदर्शने https://t.co/elQfKyculo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या मनात नेमकं काय आहे याचे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जाऊ लागले आहेत. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनं आज या भेटीविषयी सविस्तर भूमिका मांडली आहे.
…त्यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, शरद पवारांच्या भाषणाचे अनेक अर्थ https://t.co/l6oEg3tjov
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत सविस्तर निवेदनं केलं आहे. ‘प्रशांत किशोर यांनी काल शरद पवार साहेबांची भेट घेतली. जवळपास तीन तास दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र, निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडं राष्ट्रवादी काँग्रेसनं कुठलीही जबाबदारी दिलेली नाही,’ असं मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.
‘प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. राजकारणातील घडामोडींकडं ते एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघत असतात. त्यांचा तो अनुभव त्यांनी पवार साहेबांसमोर ठेवला. देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती त्यांनी पवार साहेबांना दिली,’ असं मलिक यांनी सांगितलं.
रणनीतीकार प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेणार #प्रशांतकिशोर #surajyadigital #PrashantKishor #SharadPawar #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/g5cNYrIDur
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे अशी पवार साहेबांची इच्छा आहे आणि त्यांनी ती अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार स्वत: त्या राज्यात प्रचारासाठी जाणार होते. मात्र, तब्येतीमुळं त्यांना जाता आलं नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक सक्षम आघाडी उभी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल,’ असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.
राजनैतिक रणनितिज्ञ प्रशांत किशोर और पवारसाहब की भेंट को लेकर माध्यमों द्वारा प्रदर्शित तर्कोंपर मुख्य प्रवक्ता श्री. @nawabmalikncp ने इस विडिओ के माध्यम से टिप्पणी की हैं। pic.twitter.com/f3jfWO7Zpv
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 12, 2021
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल.”
मराठा आरक्षणासाठी आता गुळगुळीत आंदोलन नको, मंत्र्यांच्या गाड्या फोडा, मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? https://t.co/4EruBnYNVt
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
प्रशांत किशोर हे निवडणूक रणनीतीकार आहेत. त्यांनी आतापर्यंत देशभरातल्या वेगवेगळे पक्ष आणि त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेसाठी काम केलं आहे. किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. त्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यासाठी काम केलं.
सांगलीत एकाच झाडाला तब्बल 22 प्रकारचे देशी-विदेशी आंबे, झाड नव्हे, हा तर आंब्याचा मॉल
https://t.co/vGYjZ7uIe4— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021