सांगली : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आगामी 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राहुल आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे बोलण्याचा परमेश्वराने एक आशिर्वाद दिलाय. पण कार्यकर्ते बरोबर असतील 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू. आपल्यात एकजूट ठेवली असती तर ते या निवडणुकीत देखील शक्य होतं. त्यामुळे एकजुटीने काम करु, असं त्यांनी म्हटलं.
खूशखबर ! पेट्रोल 1 रूपया लीटर, याला कारण काय https://t.co/RAslic2AzA
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
ते सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी इस्लामपूर येथील नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल याठिकाणी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांसमोर बोलताना हा दावा केलाय. जर सर्वानी एकजूट दाखवली तर जयंत पाटील यांना 2024 च्या निवडणुकीत घरी पाठवू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे बोलण्याचा परमेश्वराने एक आशिर्वाद दिलाय. पण कार्यकर्ते बरोबर असतील 2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू. जर आपण आपल्यात एकजुट ठेवली असती तर ते या निवडणुकीत देखील शक्य होतं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वजण एकजुटीने काम करुया, असे आवाहन केले.
2024 नंतरही शरद पवार भावी पंतप्रधानच असतील https://t.co/EKP7en7Eue
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
दरम्यान, याआधी चंद्रकांत पाटील यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजप खासदार असल्याचं वक्तव्य केलं होतं. संभाजीराजे म्हणतात मी राष्ट्रपती नियुक्त खासदार, मी भाजप खासदार नाही. पण ऑन पेपर ते भाजपचे खासदार आहेत. मला त्या वादात पडायचं नाही. मराठा आंदोलनात कोणी चालढकल करत असेल तर ते मान्य होणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
वृद्धाला बेदम मारहाण, विटा पोलिस ठाण्याचा पोलीस हवालदार निलंबित https://t.co/IrT8gQdUW6
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021