राजस्थान : राजस्थानातील अजमेरच्या आनासनगरमधील एका तलावात 500 रुपयांच्या नोटा तरंगताना आढळून आल्या. यानंतर गावभर तलावात नोटा तरंगत असल्याची बातमी पसरली. गावकऱ्यांनी तसेच, तलावाच्या सुरक्षा रक्षकांनीही नोटा लुटण्यासाठी तलावात उड्या घेतल्या. ही माहिती पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. अनेकांना 200 आणि 500 च्या नोटा हाती लागल्या. ही बॅग तलावात कोणी फेकली याचा शोध सुरु आहे.
वीटभट्टीसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू https://t.co/o5BHFDOP6p
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
तलावात कोणीतरी नोटांनी भरलेली बॅग फेकली. त्यानंतर तलावात 200-500 रुपयांच्या नोटा तरंगू लागल्या. जशी ही खबर गावकऱ्यांना मिळाली. तशी सर्वांनी तलावाकडे धाव घेतली. त्यानंतर कशाचाही विचार न करता काहींनी तलावात उड्या मारल्या आणि नोटा शोधण्यास सुरुवात केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांना काठीचा धाक दाखवून पळवून लावलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांना काठीचा धाक दाखवून पळवून लावलं.
पुणे : खासदार उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भेटीनंतर दोघांची पत्रकार परिषद #surajyadigital #meet #सुराज्यडिजिटल #उदयनराजे #संभाजीराजेhttps://t.co/Hvrj5it6Ms
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर : डॉक्टराने पेशंटना मारुन टाकले, घरी येऊन दिली धमकी, कोणत्या डॉक्टरावर आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न #solapur #surajyadigital #आत्मदहन #सुराज्यडिजिटल #सोलापूर #doctor #धमकी https://t.co/STtdGvAeD7
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
तलावात नोटांनी भरलेली बॅग कोणी आणि का फेकली याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. ही घटना आनासागर तलावाच्या रामप्रसाद घाटावर घडली. रविवारी या तलावात अज्ञातानं पैशांनी भरलेली बॅग फेकली. बॅगेतील नोटा पाण्यात पसरल्या आणि तरंगू लागल्या. त्यानंतर शहरात अफवा पसरली की तलावात नोटांचा पाऊस झाला. ही बातमी कानावर पडताच सर्वांनी तलावाकडे धाव घेतली. कशाचाही विचार न करता काहींनी तलावात उडी घेतली. त्यानंतर काहींना 500 तर काहींच्या हाती 200 रुपयांच्या नोटा लागल्या. लोकांना नोटा लुटताना बघितल्यावर तलावाच्या सुरक्षा रक्षकांनीही तलावात उडी मारली. एवढंच काय तर महापालिकेच्या कर्मचार्यांनीही बोट घेऊन नोटा लुटण्यास सुरुवात केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट
https://t.co/TmkZ3BPuRz— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
थोड्याच वेळात घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी तलावात उड्या घेतलेल्यांना काठीचा धाक दाखवून तिथून पळवून लावलं. दरम्यान ही पैशांनी भरलेली बॅग कोणी आणि का फेकली याचा तपास पोलीस करत आहेत.
सोलापूरसह राज्यातील हे जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल #surajyadigital #solapur #सुराज्यडिजिटल #सोलापूर #शिथिल #निर्बंध pic.twitter.com/TbDSHY0eyH
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021