नागपूर : नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील सावंगी देवळी येथे विटभट्टीसाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू झाला. आरुशी नामदेव राऊत आणि अभिषेक नामदेव राऊत अशी मृत मुलांची नावे आहेत. सोमवारी दुपारी या दोघांचेही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, हे दोघेही खेळत असताना नाल्याजवळील खड्ड्यात गेली असावी व तेथे अपघाताने पडली असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट
https://t.co/TmkZ3BPuRz— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
आज सोमवारी दुपारी या दोघांचेही मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. रविवारपासून हे दोघेही बेपत्ता झाल्याने त्यांचा सर्वदूर शोध सुरू होता. मात्र त्या शोधाची अखेर अशी विदारक झाली. आरुशी नामदेव राऊत (11) आणि अभिषेक नामदेव राऊत (8) अशी मृत मुलांची नावे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे दोघेही खेळत असताना नाल्याजवळील खड्ड्यात गेली असावी व तेथे अपघाताने पडली असावीत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही मृतदेह हिंगणा पोलीस ठाण्यात रवाना करण्यात आले आहेत. पोलीस इतर बाजूनेही तपास करीत आहेत.
पुणे : खासदार उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या भेटीनंतर दोघांची पत्रकार परिषद #surajyadigital #meet #सुराज्यडिजिटल #उदयनराजे #संभाजीराजेhttps://t.co/Hvrj5it6Ms
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
हिंगणा तालुक्यातील सावंगी देवळी येथील दोन बहीण-भावाचे कपडे आणि चप्पल गावातील नाल्याशेजारी आढळल्याने सकाळी खळबळ उडाली होती. ही मुले काल रविवारी दुपारपासून बेपत्ता असल्याची तक्रार मुलांच्या आईने हिंगणा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. रात्रभर या मुलांचा शोध घेण्यात आला. मात्र ते कुठेही मिळाले नव्हते. सकाळी हिंगणा पोलिसांचे पथक सावंगी देवळी येथे दाखल झाल्यानंतर मुलांचा नाल्यातील खड्यात सुरु केला. येथील गाळात मुलांचे मृतदेह अडकलेले आढळले.
सोलापूर : डॉक्टराने पेशंटना मारुन टाकले, घरी येऊन दिली धमकी, कोणत्या डॉक्टरावर आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न #solapur #surajyadigital #आत्मदहन #सुराज्यडिजिटल #सोलापूर #doctor #धमकी https://t.co/STtdGvAeD7
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021