मुंबई : राज्यातील आशा वर्कर्सने आजपासून संपाचा इशारा दिला आहे. तसेच जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आमचा संप सुरुच राहिल, असा निर्णय त्यांनी घेतला आहे. राज्यातील 72 हजाराहून अधिक आशा वर्कर कामावर न जाता घरी बसून हा संप करत आहेत. योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध मागण्यांसाठी आशा वर्कर्स संप करत आहेत.
ठाकरे सरकारचा आदेश, वाखरी ते पंढरपूर असं दीड किलोमीटरच 'पायीवारी' https://t.co/n9R4RcTcds
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध सुविधा मिळाव्यात यासाठी आजपासून राज्यातील आशा वर्कर्सने संपाचा इशारा दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आमचा संपर्क सुरुच राहिल, असा निर्णय आशा वर्कर्सने घेतला आहे. यानुसार राज्यातील 72 हजाराहून अधिक आशा वर्कर कामावर न जाता घरी बसून हा संप करत आहेत.
सख्ख्या बापाचा पोटच्या मुलांवर गोळीबार, दुस-या मुलाला गोळी घासून गेली https://t.co/6PnyXIUcJV
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना काळात केंद्र सरकार 33 रुपयांप्रमाणे 1000 रुपये देते तेही वेळेवर नाही. त्यासाठी रोज 300 रुपये मानधन मिळावं. आशा, गट प्रवतर्क महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बेड राखीव असावेत. आशां ना मास्क, पीपीइ किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर पुरेशा प्रमाणात मिळत नाही, त्यामुळे सॅनिटायझर, मास्क यांसह सुरक्षेचे साधनं मिळावीत. तब्बल 3 हजाराहून आशा कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला मात्र सरकारकडून विमा किंवा आरोग्य सुविधा दिली जात नाही. अनेक आशांचे आणि कुटुंबियांचे कोरोनात मृत्यू झाले, त्यांनाही सुविधा देण्यात आलेल्या नाही, अशा मागण्या आहेत.
आजपासून हे बंधनकारक ! सोने विक्रीसाठी हॉलमार्क बंधनकारक https://t.co/7jnQlLizeF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
वारंवार सांगूनही सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करुनही त्यांना कमी मानधन दिले जात आहे. त्यामुळे राज्यभरातील 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तक संपाची हाक दिली आहे. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला आहे.
आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य आयुक्त इत्यादी सर्वांशी वेळोवेळी बोलणे झाले आहे. गेल्या दीड वर्ष कोरोना काळात आशांनी काम केले आहे. अजूनही करत आहेत. मात्र सरकारने आश्वासन वगळता काहीच दिले नाही. ना आरोग्य सुरक्षा, ना विमा, ना योग्य मानधन…त्यामुळे निर्णायक लढाई हाच पर्याय सरकारनेच आशांपुढे ठेवला आहे, असे आशा वर्कर संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता संचारी विजय यांचा मृत्यू, कुटुंबीय करणार अवयव दान https://t.co/67sLWdH15j
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021