मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांनी ‘सच कहूं तो’ या पुस्तकात आपल्या आयुष्याबाबत अनेक खुलासे केले होते. नीना क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना प्रेग्नंट होती. त्यानंतर दोघे वेगळे झाले. तेव्हा प्रेग्नंट नीना यांना तिच्या बाळासाह स्विकारण्यासाठी अभिनेते सतीश कौशिक यांनी पुढाकार घेत लग्नाची मागणी घातली होती. पण नीनाने लग्नासाठी नकार देत एकटीने मुलगी मसाबाचा सांभाळ केला.
मुंबई : भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, हाणामारी, पहा व्हिडिओ https://t.co/SOoNh2cC9m
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
अभिनेत्री नीना गुप्ता यांनी ‘सच कहू तो’ या आपल्या आत्मकथेत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. ‘मी जेव्हा गर्भवती होते, तेव्हा अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिकने आपल्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. तसेच बाळाला स्वीकारण्याची तयारीही त्याने दाखवली होती, असे नीना यांनी म्हटले आहे. नीना यांचे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स यांच्याशी प्रेमसंबंध होते. नंतर त्यांनी मुलीला जन्म दिला.
बॉलिवूड कारकिर्दिपेक्षा आपल्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्तेत राहिलेल्या नीना गुप्ता यांनी आपल्या आत्मचरित्रात त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक खुलासे केले आहेत ज्याबद्दल आजपर्यंत कोणाला काहीच माहीत नव्हतं. असाच एक खुलासा त्यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाबाबतही केला आहे. नीना गुप्ता यांचं फार कमी वयात पहिलं लग्न झालं होतं. जे जेमतेम वर्षभरही टिकलं नाही. त्यांनी फार कमी वयात अमलान कुसुम घोष नावाच्या एका तरुणाशी लग्न केलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अलमान त्यावेळी आयआयटीमध्ये शिक्षण घेत होते. तर नीना संस्कृत भाषेचं मास्टर्स करत होत्या. आपल्या पुस्तकात नीना या लग्नाबद्दल लिहितात, अमलान आणि मी गुपचूप कॅम्पस, हॉस्टेल आणि माझ्या घराच्या जवळ भेटत असू. त्याचे कुटुंबीय दुसऱ्या शहरात राहत होते. पण त्याचे आजोबा मात्र माझ्या घराच्या आसपास राहायचे. त्यामुळे सणांच्या सुट्टीत तो आजोबांच्या घरी येत असे.
पाकिस्तानच्या संसदेत राडा; शिवीगाळ करत झाली हाणामारी https://t.co/Ewp8lcw3EY
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
प्रेग्नंट नीनाचा तिच्या बाळासह आयुष्यभर हात धरण्यासाठी सतीश कौशिक पुढे आले. त्यांनी नीनाला लग्नासाठी मागणी घातली. तिच्या बाळासह तिचा स्वीकार करण्याचं ठरवलं. बाळाला आपलं नाव देण्याचीही इच्छा व्यक्त केली. नीना गुप्ता आणि सतीश कौशिक या दोघांनी जाने भी दो यारों, मंडी या फिल्ममध्ये एकत्र काम केलं आहे.
सच कहूं तोमध्ये नीनाने सांगितलं, सतीश कौशिक यांनी तिला लग्नाची मागणी घातली. जर तिचं बाळ डार्क स्किनचं झालं तर ती लग्नानंतर हा सतीश कौशिकचा मुलगा आहे, असं सांगू शकेल. कुणाला काही समजणारही नाही. पण नीनाने लग्नासाठी नकार दिला. तिने एकटीने आपली मुलगी मसाबाला जन्म देऊन तिचा सांभाळ केला.
चिमुकल्या वेदिकाला मिळालं 16 कोटीचं इंजेक्शन https://t.co/zeYHCtF1yh
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
वयाच्या 50 व्या वर्षी तिने लग्न केलं. मुलगी मसाबासमोर तिने आपली इच्छा व्यक्त केली. 2008 साली तिने विवेक मेहराशी लग्न केलं. आता ती आपल्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.
आपल्या खासगी आणि पर्सनल आयुष्यालाही तिनं दुसऱ्यांदा संधी दिली. बधाई हो मधून तिने बॉलिवूडमध्ये जोरदार पुनरागमन केलं. त्यानंतर ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ ही फिल्म केली. ‘पंचायत’ वेबसीरिजमध्येही ती दिसली. नुकतीच रिलीज झालेली सरदार का ग्रैंडसन’ फिल्ममध्येही ती दिसली. आता ती गुडबाय फिल्मच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
युरो कप – ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम, पोर्तुगालचा विजय https://t.co/fLW6zLKUrW
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021