सोलापूर : आषाढी वारीस परवानगी द्यावी, या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय गेट समोर भजन आंदोलन करण्यात आले.
आषाढी वारी ही सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासणारी मोठी परंपरा आहे. त्यामुळे येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येणेसाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी असे आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे वतीने सोलापूरवतीनं करण्यात आलं आहे.
आंदोलन सुरूच राहणार, पुणे ते मंत्रालय लाँगमार्च शेवटचे अस्त्र – संभाजी छत्रपती, पंतप्रधानांनी ठरवलं तर मराठा आरक्षण मिळू शकतं – छत्रपती शाहू महाराजhttps://t.co/tcQwWuKja4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी आणि संबंधित निर्णय बदलून सहकार्य करावे अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्यावतीने सोलापूर येथील जिल्हा परिषद गेटसमोर भजन आंदोलन करून देण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, बळीराम जांभळे, ज्योतीराम चांगभले, संजय पवार, अविनाश पवार, कुमार गायकवाड, किशोर धायगुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वारकरी परंपरेमध्ये ” पंढरीची वारी जयाची ये कुळी | त्याची पाय धुळी लागो मज || ” या उक्ती प्रमाणे वारी विषयी धारणा खूपच मोठी असून नित्य नेमाला खूप मोठे महत्व आहे.
तो नेम निष्ठेने सांभाळला जातो. वारकरी भाविकांनी वर्षातील सर्व वारी, रामनवमी, बीज, हनुमान जयंती, गणेशोत्सव, नवरात्र हे सर्व उत्सव शासन सूचना स्वीकारून साजरे केले. महामारी कोरोनामुळे कुणीही शासन विरोधात भूमिका घेतली नाही. शासनाला आत्ता पर्यंत सहकार्यच केले.
शिवाजी महाराजांच्या कधीही न पाहिलेल्या फोटोंचा शोध https://t.co/zosxMh14Eo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
मागील वर्षी परिस्थिती वेगळी होती. केंद्र व राज्य दोन्ही सरकारचे निर्बंध होते. आता फक्त राज्य शासन निर्बंध आहेत. शिवाय सध्या रुग्ण संख्या ही खूप कमी होत आहे. त्यामुळे आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ट्रक उलटला; लोकांनी लंपास केले मोबाइल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही https://t.co/gVfqJIdmpm
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021