वेळापूर : अनेक वर्षापासून पिण्याचे पाणी आणि गावाला रस्ता नसल्याचे ग्रामस्थ तक्रारी करुन वैतागले. त्यामुळे जोपर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा व रोडचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत जांबुड ग्रामपंचायतीचे काम काज होऊ देणार नसल्याचा इशारा दिला. इशारा देऊन न थांबता ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ताब्यात घेऊन तेथच परिवारासह तळ ठोकला आहे.
ट्रक उलटला; लोकांनी लंपास केले मोबाइल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही https://t.co/gVfqJIdmpm
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
श्रीपूरमधील जांबुड गावापासून ३ किलोमीटर असलेल्या चंदनशिवे दलीतवस्तीला अनेक वर्षापासून ग्रामस्थ पिण्याचे पाण्याचा प्रश्न व निकृष्ट रस्त्यामुळे नरक यातना भोगत आहेत. चंदनशिवे दलित वस्ती ग्रामस्थांनी जांबुड गावामधून ग्रामपंचायतीने सार्वजनिक पाणीपुरवठा करणार्या टाकीमधून पाईप लाईनने चंदनशिवे दलित वस्तीवर पाणी आणून पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी केली आहे. सध्या ग्रामस्थांना पाण्यासाठी ३ किलोमीटर अंतरावर जावुन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर : आषाढीवारीच्या परवानगीसाठी वारकरी मंडळाकडून भजन आंदोलन https://t.co/CUeHYtpnGP
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
त्यात रस्ता चिखलमय झाल्याने ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रोडचे त्वरीत डांबरीकरण करण्याचीही मागणी केली आहे. यासाठी निवेदन देण्यात आले आहेत. पण मागणी पूर्ण न झाल्याने १४ जूनपासून चंदनशिवे दलित वस्ती ग्रामस्थ सर्व कुटुंबे जांबुड ग्रामपंचायत कार्यालयात बेमुदत मुक्कामी राहतील, असा इशारा देण्यात आला होता. तरीही याकडे दुर्लक्ष केल्याने जांभूड ग्रामपंचायत ताब्यात घेऊन तेथेच राहण्यास सुरुवात केली आहे, त्यांनी ग्रामपंचायत मध्ये तळ ठोकला आहे. तसेच त्यांची असणारे गुरेही ग्रामपंचायतसमोर बांधण्यात आली आहेत.
सोलापूरच्या पालकमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम https://t.co/nKr2okUdrK
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
जांभूड ग्रामपंचायत जोपर्यंत आमच्या चंदनशिवे दलितवस्तीचा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न सोडवत नाही, तोपर्यंत जांभूड ग्रामपंचायतीचे कामकाज होऊ देणार नाही, असा चंदनशिवे दलित कुटुंबीयांनी निश्चय केला आहे.