नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे केलं. शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने हा निर्णय घेतल्याचे केंद्राने सांगितले होते. पण NTAGI च्या शास्त्रज्ञांनी लशीच्या दोन डोसमधील अंतर 8 ते 12 आठवडे ठेवण्यास सहमती दिली होती. हे अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस आम्ही केलीच नाही, असं नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम. डी. गुप्ते यांनी सांगितले.
प्रेग्नंट नीना गुप्तांना 'या' अभिनेत्याने घातली होती लग्नाची मागणी https://t.co/oClO8HIkyG
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीव्र लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. देशात सध्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूट ची कोव्हीशील्ड आणि गुजरात मधील भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन या दोन लसी प्रामुख्याने दिल्या जात आहेत. यापैकी कोव्हीशील्डचा पहिला डोस दिल्यानंतर सहा ते आठ आठवड्यानंतरचे आंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्यात आले. सरकारच्या या निर्णयावर देशातील अनेकांनी आक्षेप घेत टीका केली होती. देशात लसीचा तुटवडा असल्यामुळे दोन डोसमधील अंतर वाढवण्यात आल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला होता. मात्र शास्त्रज्ञांच्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.
मुंबई : भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा, हाणामारी, पहा व्हिडिओ https://t.co/SOoNh2cC9m
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
मात्र आता लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती असा धक्कादायक खुलासा तज्ञ गटातील तीन सदस्यांनी केला. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पाकिस्तानच्या संसदेत राडा; शिवीगाळ करत झाली हाणामारी https://t.co/Ewp8lcw3EY
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीचे माजी संचालक एम डी गुप्ते यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की या शास्त्रज्ञांनी लसीचे दोन मधील अंतर आठ ते बारा आठवड्यांपर्यंत वाढवण्यासाठी सहमती दर्शविण्यात आली होती पण डोस मधले अंतर 12 ते 16 आठवड्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती कारण बारा आठवड्यानंतर लस घेतलेल्या नागरिकांमध्ये काही संभाव्य परिणाम होऊ शकतो याचा डेटा NTAGI कडून आला नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
याच संस्थेच्या दुसऱ्या एका सदस्याने देखील गुप्ते यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या लसी मधील अंतर वाढवण्याचा निर्णय यामागं काहीतरी काळंबेरं असावा असा संशय आता व्यक्त केला जात आहे. पी. मुलीयिल यांनीदेखील सरकारच्या संबंधित निर्णयावर आक्षेप घेतला. त्यांनी रॉयटर्स बोलताना सांगितले की लसींचा दोन डोस मधील अंतर वाढविण्याबाबत संबंधित तज्ज्ञ गटाचा चर्चा झाली हे खर आहे पण दोन डोसमधील अंतर हे 12 ते 16 आठवडे करावा अशी शिफारस आम्ही केलीच नव्हती. त्यासाठी नेमके आकडेही सांगितले नव्हते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.
अभिनेत्री घेत होती ड्रग्ज; पोलिसांनी भर पार्टीतून केली अटक https://t.co/eUnO7zmYyD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021