नाशिक : आगळावेगळा विवाह सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. मनमाड शहरातील किन्नरांच्या महंत शिवलक्ष्मी आणि येवला तालुक्यातील तरुण संजय झाल्टे यांची टिकटॉकच्या माध्यमातून ओळख झाली. नकळत या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुखी संसाराची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला.
शॉर्ट ड्रेसमधील शालूचा जबरदस्त डान्स, हावभाव आणि ठुमके पाहून चाहते घायाळ #shalu #शालू #surajyadigital #shortdress #सुराज्यडिजिटल #डॉन्स #dance pic.twitter.com/TZECjTxHsI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
रूढी-परंपरांचे सामाजिक बंधने झुगारून एका तरुणाने त्याची प्रेयसी असलेल्या किन्नराच्या गळ्यात सर्वांच्या साक्षीने वरमाला घालून मंगळसूत्र बांधले आहे. समाज आणि लोक काय म्हणतील, असा विचार दोघांच्याही मनात आला असला तरी प्रेमाच्या ताकदीपुढे हा विचार टिकाव धरू शकला नाही. अखेर दोघे विवाहबंधनात अडकले आहेत.
दोघांनी आपापल्या परीने प्रयत्न करून घरच्या लोकांना पटवून दिले की, ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्यांचे एकमेकांवरील प्रेम पाहून अखेर दोघांच्या परिवारातील सदस्यांनी लग्नाला होकार दिला. त्यानंतर महंत शिवलक्ष्मी व संजय झाल्टे या दोघांचा मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूर येथील नागेश्वर महादेव मंदिरात लग्नसोहळा पार पडला. यावेळी दोघांच्या घरातील काही मंडळी आणि मोजके मित्र उपस्थित होते.
अगदी नववधू-वराप्रमाणे लक्ष्मीचे सासरी म्हणजे येवला तालुक्यातील मातुलठाण येथे घरी स्वागत करण्यात आले. पती-पतीप्रमाणे संसार करण्याचे स्वप्न हे नवदांपत्य पाहत आहे.
डब्ल्यूटीसी फायनल – आज मुकाबला, असा आहे भारताचा संघ #WTCFinal #डब्ल्यूटीसी #संघ #final #मुकाबला #indianteam #सुराज्यडिजिटल #surajyadigital pic.twitter.com/P5otUDABsq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विशेष म्हणजे हा विवाह सोहळा आगळावेगळा जरी असला तरी रीतसर सर्व धार्मिक विधी करण्यात आले. नववधू आता पहिले मूळ लावून येवला येथे माहेरी नांदायला गेली आहे. संजयच्या कुटुंबाने समाजाचा विचार न करता महंत शिवलक्ष्मीला सून म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे या आगळ्यावेगळ्या लग्नाची चर्चा जिल्ह्यात होत आहे.
मी पहिली किन्नर आहे, जी सासरी नांदायला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमची ओळख झाली. त्यात आमच्यात प्रेमाचे संबंध निर्माण झाले. वैदिक पद्धतीने आमचा विवाह पार पडला. एक किन्नर म्हणून नाही तर एक लक्ष्मी म्हणून माझा सासरच्या लोकांनी स्वीकार केला. खरेच याचा मला खूप आनंद आहे. मी एक नवीन पाऊल उचलले आहे.
शिवसेना भवनासमोरील 'शिवप्रसादा'च्या वाटपास मुख्यमंत्र्यांचे समर्थन ? https://t.co/GnI0YJnTI5
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
* सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख
किन्नरांच्या महंत समजल्या जाणाऱ्या महंत शिवलक्ष्मीने साध्या रीतिरिवाजाप्रमाणे मनमाडजवळील नागापूरच्या प्राचीन नागेश्वर महादेव मंदिरात येवल्याच्या मातुलठाण येथे राहणाऱ्या संजय झाल्टे या सुशिक्षित तरुणाशी विवाह केला. या लग्नसोहळ्याला परिवारातील मोजके लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंबांनी वर-वधूच्या इच्छेला मान देत हे लग्न पार पाडले. महंत शिवलक्ष्मी व संजयच्या प्रेमकहाणीची आणि साताजन्माची गाठ पडायची कथाच वेगळी आहे. महंत शिवलक्ष्मी व संजयची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. या दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. समाज काय म्हणेल याकडे लक्ष न देता या दोघांनी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजसंकेत झुगारून या विवाहाला समाज कितपत स्वीकारेल, याची दोघांनाही भीती नव्हती. कुटुंबीय होकार देतील का याची मात्र चिंता होती. प्रेमासाठी दोघांनीही आपल्या कुटुंबांची संमती मिळविली. दोघेही रेशीमगाठीत बांधले गेले.
ट्विटरनंतर आता इन्स्टाग्रामवर एफआयआर दाखल https://t.co/1R20RV7BjX
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021