टोकयो : ऑलिम्पिक स्पर्धेला 23 जुलैपासून सुरुवात होत आहे. यासाठी जगभरातील खेळाडू टोकयोत पोहोचतील. स्पर्धेतील खेळाडूंना दीड लाख कंडोम वाटण्यात येणार असल्याचं समोर आलंय. मात्र, यानंतर खेळाडूंसाठीच्या खोल्यांचे फोटो समोर आले. खोल्यांमधील बेड्स कार्डबोर्डपासून बनवण्यात आले आहेत. या बेड्सनी खेळाडूंचे वजन पेललं तरी पुरे आहे. त्यामुळे कंडोम वाटप निरुपयोगी असल्याची प्रतिक्रिया खेळाडूंमधून व्यक्त होत आहे.
ऑनलाईन शॉपिंगच्या मोठ्या डिस्काऊंटवर सरकारची बंदी?; फ्लॅश सेल होणार बंद https://t.co/NpAmvCvz78
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021
1988 मध्ये एड्स, एचआयव्हीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ऑलिम्पिकमधील खेळाडूंना कंडोम वाटप करण्याची सुरुवात झाली. एका अभ्यासानुसार, ऑलिम्पिकमध्ये येणारे 75 टक्के खेळाडू सेक्शुअल अॅक्टीव्हीटी करतात. यापैकी जलतरण स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू यात अधिक सहभागी असतात. कारण त्यांच्या स्पर्धा संपूर्ण ऑलिम्पिक समाप्तीच्या एका आठवडा आधी संपतात, त्यामुळे हे खेळाडू आपला वेळ मौजमजेत घालवतात.
योग दिनाच्या दिवशी करीनाने मेकअप न करता फोटो केला पोस्ट, 'व्वा आजी व्वा' #Karina #yoga #surajyadigital #मेकअप #karinakapoor #makeup #सुराज्यडिजिटल #post pic.twitter.com/8emVEwONXJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत आहे. 8 ऑगस्टपर्यंत या स्पर्धा चालणार आहेत. ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी जगभरातील विविध देशांचे खेळाडू टोकयोला पोहोचतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सध्याच्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी सर्व काळजी घेण्यात येत असून, क्रीडा आयोजन समितीनं खेळाडूंच्या निवासासाठी खास टोकियो अॅथलीट व्हिलेज हे एक वेगळं गावच तयार केलं आहे. या गावात खेळाडूंच्या राहण्यापासून ते त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या पुजा-याला पोलिसांकडून मारहाण, पहा व्हायरल व्हिडिओ https://t.co/0ECXhGqnEF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
इथं शॉपिंग कॉम्प्लेक्सपासून रेस्टॉरंटसपर्यंत सर्व सोयी आहेत. याबरोबरच आणखी एक माहिती पुढं आली आहे ती मात्र धक्कादायक आहे. ऑलिम्पिकमध्ये आलेल्या खेळाडूंना सुमारे दीड लाख कंडोम वाटण्यात येणार असल्याची माहिती पुढं आली आहे. मात्र खेळाडूंसाठी तयार केलेल्या खोलीचे फोटो प्रदर्शित होताच खेळाडूंनी कंडोम वाटप निरुपयोगी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कारण खेळाडूंसाठी तयार केलेल्या खोल्यांमध्ये असलेले बेडस हे कार्डबोर्डपासून बनवण्यात आले आहेत. त्यामुळं ते फार मजबूत नाहीत. या बेड्सनी खेळाडूंचे वजन पेललं तरी पुरे आहे, अशी प्रतिक्रियाही खेळाडूंमधून व्यक्त होत आहे.
Update: Play on Day 4 abandoned due to rain. We thank our fans who turned up and kept the tempo high. See you again, tomorrow.🙌 #TeamIndia #WTC21 pic.twitter.com/0OpqZ0hGd5
— BCCI (@BCCI) June 21, 2021
जगभरात पसरलेलं कोरोना विषाणूच्या साथीचं संकट अजून संपलेलं नसताना जपाननं ऑलिम्पिक ठरलेल्या वेळेनुसार घेण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळं ऑलिम्पिक संघटना आधीच वादात सापडली आहे. कोरोना सुरक्षा नियमांनुसार, एकीकडे खेळाडूंना सामाजिक अंतर राखण्यास सांगितलं गेलं आहे तर दुसरीकडे, खेळाडूंमध्ये दीड लाख कंडोम वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळं सामाजिक अंतराचा नियम पाळून खेळ होणार असतील तर मग इतके कंडोम वाटण्याचं कारण काय? असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला आहे. यावर हा कंडोम खेळांच्या कालावधीसाठी नसून तो खेळाडूंना घरी नेण्यासाठी असतो, असं उत्तर आयोजकांनी दिलं आहे.
आनंदाची बातमी; पुणे विद्यापीठात सुरु होतोय 'योगा' हा नवा अभ्यासक्रम https://t.co/2ZnfH5zWBh
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021