मुंबई : शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना ICU आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. शिवतारे यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याचे त्यांच्या मुलीने सांगितले आहे. पत्नी मुलं यांच्यासोबत असलेल्या संपत्तीच्या वादातून विजय शिवतारे यांची अशी दयनीय अवस्था झाल्याचा आरोप त्यांची मुलगी ममता शिवदीप लांडे यांनी केला आहे. ममता लांडे या पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत.
अमिताभ बच्चन यांच्या पुजा-याला पोलिसांकडून मारहाण, पहा व्हायरल व्हिडिओ https://t.co/0ECXhGqnEF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
विजय शिवतारे यांच्या कन्या व आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांची पत्नी ममता शिवतारे- लांडे यांनी आज सकाळी वडिलांच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहित हे आरोप केले आहेत. ‘माझ्या पित्याची माझ्याच भावानं संपत्तीच्या लोभापायी केलेली दयनीय अवस्था पाहून मी अत्यंत अस्वस्थ आहे,’ असं ममता यांनी म्हटलं आहे.
तोकडे कपडे घालाल तर पुरुषांवर परिणाम होणारच – इम्रान खान https://t.co/nLrfKJJdh4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
शिवतारे कुटुंबातील कलह समोर आला आहे. मुलांनी दिलेल्या त्रासामुळेच त्यांनी ह्रदयविकाराचा झटका आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसंच आपल्या भावांच्या संपत्तीच्या लोभापायी वडिलांची ही दयनीय अवस्था झाल्याचं म्हटलं आहे. ममता लांडे-शिवतारे यांनी ही पोस्ट लिहिली असून विजय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप ममता यांनी केला आहे. तसंच प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु होतं असाही आरोप त्यांनी केला आहे. तसंच आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली. तरीही जेजुरीतील इथेनॉल प्लांट नावावर करून देण्यासाठी वारंवार त्यांच्याकडून दबाव टाकण्यात येत आहे असाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ऑनलाईन शॉपिंगच्या मोठ्या डिस्काऊंटवर सरकारची बंदी?; फ्लॅश सेल होणार बंद https://t.co/NpAmvCvz78
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021
मागील काही दिवसात फेसबुकवरून होत असलेल्या पोस्टने आपल्या मनात संभ्रम निर्माण केला आहे. माझा भाऊ विनय विजय शिवतारे काही कौटुंबिक वादातून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ही कित्येक वर्ष असाच त्रास बाबांनी सहन केला. मात्र कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, कारण त्यामुळे माझे भाऊ व त्यांच्या कुटुंबाला हानी पोहोचेल अस त्यांना वाटत होतं व आजही वाटतं.
योग दिनाच्या दिवशी करीनाने मेकअप न करता फोटो केला पोस्ट, 'व्वा आजी व्वा' #Karina #yoga #surajyadigital #मेकअप #karinakapoor #makeup #सुराज्यडिजिटल #post pic.twitter.com/8emVEwONXJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021
मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये अत्यंत गंभीर प्रकृती असताना त्यांचे बायपास झाले हे आपणा सर्वांना माहितच आहे. डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याची शक्यता २० टक्के आहे असे सांगितले. माझा भक्कम असा आधारस्तंभ ढासळतो की काय या भीतीने माझी झोपच उडाली होती. ऑपरेशन यशस्वी झालं, मात्र त्यानंतरही जीवाला धोका असताना माझा मोठा भाऊ सतत धमक्या देऊन मानसिक त्रास देत होता. मागील दीड वर्षांपासून किडनीच्या आजारामुळे बाबा एक दिवसाआड डायलीसिसला जातात. या दीड वर्षात एकदाही माझ्या दोन्ही भावांपैकी कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाही. ते आहेत की नाही ? याची सुद्धा विचारपूस केली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने मानसिक दबाव अजून वाढवून त्यांना कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरु झाले. आजवर आयुष्यभर कमावलेली सगळी संपत्ती विनय व विनस व त्यांच्या कुटुंबाच्या नावे बाबांनी केली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रात उद्यापासून (22 जून) 18 वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण #HealthMinister #surajyadigital #लसीकरण #सुराज्यडिजिटल #maharashtra #महाराष्ट्र #vaccinationday2021 pic.twitter.com/KzHPYF9BTu
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021