उमरगा : उमरगा तालुक्यातील कसगी सीमेवर कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्राच्या हद्दीत बांधण्यात येणाऱ्या तपासणी नाक्याचे बांधकाम आज रविवारी (ता.२७) कसगी ग्रामस्थ आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखले. यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
सोलापूर : लॉकडाऊनमध्ये काळजी घेतली मात्र अनलॉकमध्ये बेजबाबदार का ? पहा सोलापूरची बालकलाकार ओवी तडवळकर काय सांगतीय, ऐका थोडं… #ovi #ओवी #लॉकडाऊन #surajyadigital #lockdown #Unlock #solapur #सोलापूर #care #listen #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/WcAL7qtszq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
कर्नाटकचे सीमा तपासणी नाके हे महाराष्ट्राच्या हद्दीत उभारल्याची माहिती मिळताच या सीमा तपासणी नाक्याला उमरगा तालुक्यातील कसगी गावातील ग्रामस्थ आणि शिवसैनिकांनी विरोध केला. कसगी गावातील गावकरी व शिवसैनिक तपासणी नाके काढण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळातच उमरगा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
अभिमानास्पद ! 3 कोटी लोकांना लस देणारा पहिला राज्य ठरला महाराष्ट्र, 12 ते 18 वयोगटातील मुलांसांठी कोरोना लस लवकरच उपलब्ध होणारhttps://t.co/5iRCEBHpRH
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शनिवारी (ता.२६) उस्मानाबादचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कसगी येथील कर्नाटक पोलीस प्रशासनाकडून होऊ घातलेल्या तपासणी नाका आपल्या राज्यातील हद्दीत होऊ नये.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, ४ अभिनेत्रींसह २२ जण अटकेत, ताब्यात घेतलेल्यांची नावे https://t.co/kMGDLqOGMM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
भविष्यात हा प्रश्न संवेदनशील होऊ शकतो. यासाठी खबरदारी घेण्यास सांगितले होते. तरीही आज रविवारी सकाळी कर्नाटक पोलिस प्रशासनाने सीमेवर तपासणी नाका उभारण्यासाठीचे बांधकाम साहित्य आणून टाकले.
याची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, योगेश तपसाळे, माजी सरपंच हणमंत गुरव, शरद भोसले, प्रशांत पाटील, बलवीर राजपूत, अमरसिंह राजपूत यांच्यासह ग्रामस्थ व पोलीस उपनिरीक्षक अमोल मालूसुरे यांनी सीमेवर जाऊन बांधकामास विरोध दर्शविला. या दरम्यान वादावादी व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
शिवसेना नेत्याची निर्घृण हत्या; डोळ्यात मिरचीपूड टाकून सपासप वार https://t.co/pncPid9UHc
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
शहापुरे यांचा कर्नाटक पोलिस व प्रशासनातील अधिकाऱ्याबरोबर वाद झाला. शेवटी कर्नाटक पोलिसांनी माघार घेत काम थांबविले असून उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सीमेवर आता उमरगा पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारताच्या विजयाचे शिल्पकार सॅम माणेकशॉ यांना विनम्र अभिवादन ! #शिल्पकार #surajyadigital #सुराज्यडिजिटल #india #विजय #सॅममाणेकशॉ #sammamish pic.twitter.com/mFPDpcB8L3
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021