नवी दिल्ली : भारताच्या राही सरनोबतने नेमबाजी विश्वकप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. मराठमोळ्या राहीने 25 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली आहे. नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे. अंतिम फेरीत राहीने 40 पैकी 39 गुण मिळवले. तिने फ्रेंच आणि रशियन नेमबाजांना मागे टाकत सुवर्ण कामगिरी केली आहे. नेमबाजीचे विश्वकप क्रोएशियाच्या ओजीसेक या ठिकाणी सुरु आहे.
Indian shooter Rahi Sarnobat wins gold medal in the women's 25M Pistol event at the ISSF World Cup in Osijek, Croatia.
(Pic courtesy: SAIMedia Twitter) pic.twitter.com/NArVffhyf5
— ANI (@ANI) June 28, 2021
भारताची आघाडीची नेमबाज राही सरनोबतने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकप (ISSF World Cup) स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे. महाराष्ट्राची कन्या राहीने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. क्रोएशिया येथे होत असलेल्या यंदाच्या नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेतील हे भारताचे पहिलेच सुवर्णपदक ठरले. याआधी भारताला एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळाली होती. भारताची स्टार युवा नेमबाज मनू भाकरला मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
#indiacricketwomen
भारतीय महिला संघाचा पराभव, मात्र शेफालीने रचला इतिहास https://t.co/9FxSUWQHcq— Surajya Digital (@SurajyaDigital) June 28, 2021
30 वर्षीय राहीने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 39 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तिने अंतिम फेरीच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मालिकेमध्ये अचूक नेम साधला. फ्रान्सच्या माथिलदे लमोल्लेने 31 गुणांसह रौप्यपदक जिंकले. त्याआधी पात्रता फेरीत राहीने 591 गुणांसह दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरी गाठली होती.
What a superb performance by #Tokyo2020 bound 25m pistol shooter @SarnobatRahi as she wins the 🥇 at the @ISSF_Shooting World Cup in Osijek, Croatia.
She was 8 points ahead of the silver medalist. Many congratulations! #Cheer4India pic.twitter.com/oLDZj9wLcg
— SAI Media (@Media_SAI) June 28, 2021
राहीनं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत जागतिक पातळीवर नेमबाजीच्या विश्वचषक स्पर्धेत आपली चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली. सुरुवातीपासूनच आघाडी घेत राहीनं अचूक लक्ष्यवेध घेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. तर दुसरीकडे भारताच्या मनु भाकर हिला 7 व्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.
पहिल्या 10 फैरीनंतर राही दुसऱ्या स्थानावर होती. त्यानंतर राहीनं मुसंडी मारत अखेरपर्यंत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखलं.
रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, ४ अभिनेत्रींसह २२ जण अटकेत, ताब्यात घेतलेल्यांची नावे https://t.co/kMGDLqOGMM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021