नवी दिल्ली : कोरोना काळात आव्हान निर्माण झालेल्या आरोग्य क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. या निधीचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीसाठी होणार आहे. याव्यतिरिक्त इतर विभागांसाठी 60 हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.
पर्यटकांसाठी गुडन्यूज! माथेरान झाले अनलॉक https://t.co/th3ZuEcEJI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 28, 2021
गेल्या वर्षभरापासून भारतात कोरोनामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. लॉकडाऊनमुळे प्रत्येक क्षेत्राला मोठा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे या क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने जवळपास 1.1 लाख कोटींच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला आणि आरोग्य क्षेत्राला बुस्टर डोस दिलाय. त्यांनी आरोग्य क्षेत्राला मोठा निधी देताना 8 महत्त्वाच्या घोषणा केल्यात. सीतारमण म्हणाल्या, “आजच्या 8 उपाययोजनांमध्ये 4 उपाय नवे आहेत आणि आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहेत. या अंतर्गत कोविडने प्रभावित झालेल्या क्षेत्रांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची लोन गॅरंटी स्कीम सुरू करण्यात येईल. या कर्ज योजनेत नॉन मेट्रो मेडिकल इंफ्रास्ट्रक्टरसाठी 50 हजार कोटी रुपये आणि अन्य दुसऱ्या सेक्टर्ससाठी 60 हजार कोटी रुपये क्रेडिट गॅरंटी देण्यात येईल. मागील काही दिवसांत सरकार कोरोनाने बाधित झालेल्या सेक्टर्सला मदत करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
Once international travel resumes, first 5 lakh tourists who come to India will not have to pay visa fees. Scheme applicable till March 31, 2022, or will be closed after distribution of first 5 lakh visas. One tourist can avail benefit only once: Finance Min Nirmala Sitharaman pic.twitter.com/RnLXu9D8lo
— ANI (@ANI) June 28, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
#indiacricketwomen
भारतीय महिला संघाचा पराभव, मात्र शेफालीने रचला इतिहास https://t.co/9FxSUWQHcq— Surajya Digital (@SurajyaDigital) June 28, 2021
अर्थमंत्र्यांनी छोट्या उद्योगांना दिलासा देण्यासाठी इमरजेंन्सी क्रेडिट गॅरंटी स्कीम(ECLGS)मधील निधी वाढवण्याची घोषणा केली आहे. सध्या ही योजना 3 लाख कोटींची आहे ती आता 4.50 लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेतंर्गत MSME, हॉस्पिटॅलिटी सेक्टर्सला 2.69 लाख कोटी वितरीत केले जाणार आहेत. तसेच मायक्रो फायनॅन्स इंस्टिट्यूशनच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी क्रेडिट गँरंटी स्कीमची घोषणा केली आहे. ही नवी योजना आहे. या अंतर्गत व्यावसायिक बँकांच्या MFI ला देण्यात येणाऱ्या कर्जासाठी गॅरंटी दिली जाईल. या योजनेचा फायदा 25 लाख लोकांना होईल असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.
कर्नाटक सीमावर्ती चेकपोस्ट महाराष्ट्राच्या हद्दीत, काही काळासाठी तणाव https://t.co/1qduh2UiJC
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
आजच्या पत्रकार परिषदेत 8 आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाणार आहे. त्यातील 4 नवीन आहेत तर एक विशेष आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी देण्यात येणार आहे. राज्यातील लॉकडाऊनमुळे ज्यांना फटका बसला अशांना मदत करण्यासाठी सरकारने या पॅकेजची घोषणा केली आहे. मागील वर्षी कोरोना महामारीने प्रभावित झालेल्यांना क्षेत्रांना दिलासा देण्यासाठी सरकारने आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली होती. सरकारने यात एकूण 2.71 लाख कोटींची घोषणा केली होती.
Farmers to get additional protein-based fertilizer subsidy of nearly Rs 15,000 crores: MoS Finance Anurag Thakur pic.twitter.com/DFxNEYrFde
— ANI (@ANI) June 28, 2021
आंतरराष्ट्रीय प्रवास सुरु झाल्यानंतर भारतात येणाऱ्या सुरुवातीच्या 5 लाख परदेशी पर्यटकांना व्हिसासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. ही योजना 31 मार्च 2022 पर्यंत लागू असेल किंवा 5 लाख पर्यटकांची मर्यादा संपल्यानंतर ही योजना बंद होईल. एका पर्यटकाला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा, ४ अभिनेत्रींसह २२ जण अटकेत, ताब्यात घेतलेल्यांची नावे https://t.co/kMGDLqOGMM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021