सोलापूर : शहरातील रेल्वेलाईन परिसरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयावर गुरुवारी दुपारी अज्ञात इसमांनी दगडफेक केली. यावेळी कार्यालय बंद होते या दगडफेकीत कार्यालयाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, खिडक्यांवर दगड अडकून पडले. यात कार्यालयाची नासधूस झाली नाही.
सोलापूर : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर आज सायंकाळी ८ वाजता दगडफेक झाली. पडळकरांची प्रतिक्रिया #surajyadigital #Solapur #सुराज्यडिजिटल #दगडफेक #सोलापूर #political #politics #प्रतिक्रिया #पडळकर #भाजपा #MLAhttps://t.co/L8XSlPW8Vu
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021
काल बुधवारी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूर शहरात याचे पडसाद उमटले. पडळकर यांच्या गाडीवर थेट दगड घालण्यात आला. याबाबतचे चित्रण समोर आले आहे. त्यानंतर शहरात बराच गोंधळ झाला. पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पोलीस आयुक्तालयात ठिय्या मांडला, शेवटी पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर कार्यकर्ते शांत झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर आज सायंकाळी ८ वाजता दगडफेक झाली. पडळकरांची प्रतिक्रिया #surajyadigital #Solapur #सुराज्यडिजिटल #दगडफेक #सोलापूर #political #politics #प्रतिक्रिया #पडळकर #भाजपा #MLAhttps://t.co/kktnqG8k94
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 1, 2021
या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. यावेळी त्यांना खिडक्यांवर दगड अडकल्याचे दिसून आले. दरम्यान, संशयित तरुणाविरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच गोपीचंद पडळकर यांच्यासह 25 जणांवर जमावबंदी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी, मला संस्कार शिकवण्याची गरज नाही
https://t.co/g7ULJteTBV— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021
भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर हे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर टीका करत आहेत. शरद पवार, संजय राऊत यांच्यावर सातत्याने पडळकर टीका करत आहेत. आज दुपारी सुद्धा शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार हे मी लहान असल्यापासून ऐकतोय की ते पंतप्रधान होणार आहेत. मागील 30 वर्षांपासून ते भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. दिल्लीत हे नेते एकत्र जमले हे म्हणजे असं झालं की रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात अशा शब्दांत पडळकर यांनी टीका केली होती.
आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक, पडळकरांची प्रतिक्रिया https://t.co/cySM7ghF1V
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021
* सुरक्षेची मागणीसाठी नियोजित स्टंट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटलं, जी घटना झाली ही कुठल्याही सन्माननीय सदस्याच्या गाडीवर होऊ नये, मात्र, हा भारतीय जनता पक्षाकडून घडवून आणलेला नियोजित स्टंट आहे. अशा प्रकारचा स्टंट घडवून आणायचा आणि स्वत: प्रकाश झोतात यायचं. मग, सुरक्षेची मागणी करायची. शरद पवारांवर ज्या पातळीवर टीका करण्यात आली ती भाषा हलकटपणाची म्हणता येते. हलकटपणाची भाषा करुन टीका करणाऱ्यांनी पब्लिसिटी करणाऱ्या भाजपने शहानपणा शिकवू नये.
प्रॉपर्टीच्या वादातून विवाहितेचा पती, दिराने केला गळा दाबून खून https://t.co/XpHBxZJvTW
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021