सोलापूर : आज सकाळी जोडबसवण्णा चौकात देगांवकर दवाखान्यासमोर उमेरा फैयाज सगरी या (वय – १४) आयशर ट्रकच्या धडकेनं जागीच मृत्यू झाला. मुस्लिम पाच्छापेठकडे खाजगी शिकवणीसाठी निघालेली उमेरा हिला समोर येणाऱ्या आयशर मालवाहू ट्रकची धडक बसली.
गंभीर जखमी अवस्थेत तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जड वाहतुकीला सकाळी ७ वाजल्यापासून बंदी असतानाही हा ट्रक जोडबसवण्णा चौकात आला कसा, असा सवाल या भागातील नागरीक अपघातानंतर करत होते.
जड वाहतुकीचे अपघात दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी सकाळी जोडबसव परिसरात सायकलवरून अभ्यासासाठी जाणाऱ्या एका तेरा वर्षाच्या मुलीला जड वाहतुकीच्या ट्रकने धडक दिल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.यामुळे शहरात पुन्हा एकदा जड वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.