मुंबई : पोलीस दलात शिपाई असताना त्यानंतर निवृत्त होईपर्यंत पीएसआय पदापर्यंत जाता येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सादर करणार आहेत. शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावं, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहे, असं वळसे पाटलांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पोलीस दलात शिपाई असताना त्यानंतर निवृत्त होईपर्यंत पीएसआय पदापर्यंत जाता येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सादर करणार आहेत. याबाबत त्यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती दिली आहे.
पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावे, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) July 3, 2021
पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावं, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार आहे, असं दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत संबंधित पदाची संख्या, आरक्षण, पात्रता असे निकष प्रमोशनसाठी लागू होतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी घेतले ताब्यात, तात्या काय म्हणाले ? https://t.co/UUPv0U2pLQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021
मात्र आता हे निकष तर असतीलच पण त्यासोबत या प्रस्तावानुसार तरूण एक शिपाई म्हणून जरी पोलीस खात्यात भरती झाला तर त्याला पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावं, यासाठी गृृहविभाग खातं प्रस्ताव तयार करत आहे.
* पोलीस खात्यातील महत्त्वाचा निर्णय
येेत्या 5 आणि 6 तारखेला अधिवेशन असणार आहे. आधीच अधिवेशनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. या अधिवेशनानंतर गृहविभाग या प्रस्तावाबाबत निर्णय घेणार आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर पोलीस खात्यातील हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.
ईडीची कारवाई; अभिनेता दिनो मोरया, अहमद पटेल यांच्या जावयाची संपत्ती जप्त
https://t.co/xh1mmvfUdg— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021