मेक्सिको : मेक्सिकोच्या युकाटन भागात समुद्रात भीषण आगली लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समुद्रात ही आग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु पाण्याखाली असलेली गॅसची पाईपलाईनची गळती झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. ट्विटरवर मॅन्यल लोपझ या युजरने याचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत 5 कोटीहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तर 26 हजार नेटक-यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. समुद्रामध्ये ज्वालामुखी फुटल्यासारखे वाटावे असे या व्हिडीओतील दृश्य आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समुद्रातून जाणारी गॅस पाईपलाईन लीक झाल्यामुळे ही आग लागली होती.
🚨 Incendio registrado en aguas del Golfo de México
A 400 metros de la plataforma Ku-Charly (dentro del Activo Integral de Producción Ku Maloob Zaap)
Una válvula de una línea submarina habría reventado y provocado el incendio
Esta fuera de control hace 8 horas pic.twitter.com/KceOTDU1kX
— Manuel Lopez San Martin (@MLopezSanMartin) July 2, 2021
आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर केला जातो. परंतु पाण्यातच आग लागली असे सांगितले तर आश्चर्य वाटेल. पण ही गोष्ट खरी आहे. मेक्सिकोतल्या समुद्रात भीषण आगली लागली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओला कोट्यवधी व्ह्युज मिळाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मेक्सिकोकच्या युकाटन भागात शुक्रवारी समुद्रात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत होत्या. समुद्रात ही आग पाहून अनेकांन आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु पाण्याखाली असलेली गॅसची पाईपलाईनची गळती झाल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. ही आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ट्विटरवर मॅन्यल लोपझ या युजरने या घटनेचा व्हिडीओ आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे.
मेक्सिकोची सरकारी पेट्रोलियम कंपनी पेमेक्सच्या गॅस वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला दुर्घटना झाली. ही पाईपलाईन समुद्राच्या मध्ये आहे. समुद्रामध्येच गॅस लीक झाल्यामुळे मोठ्या स्वरुपात आग लागली होती. लाला आणि तांबड्या रंगाच्या ज्वाळा आपल्याला या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.