सोलापूर : शहरात गेली चार दिवस झाले, लसीकरण ठप्प आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असतानाही लसीकरण का होत नाही ? पालिका प्रशासनाने शासनाकडे काय पाठपुरावा केला याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना पालिका आयुक्तांनी तुमच्या मोदींनी लस पुरवठा केला नाही … मी काय खिशातून देऊ असे म्हटल्याने नगरसेवक सुरेश पाटील यांचा पारा चढला. दोघांचे संतुलन गेल्याने एकमेकांची उणीदुणी काढत हमरीतुमरी झाली तब्बल अर्धा तास ही खडाजंगी चालू होती. त्यामुळे आयुक्तांच्या दालनातील वातावरण गंभीर झाले होते.
सोलापूरच्या 'मार्शल लॉ' वर 6 तासाची वेब सिरीज येणार https://t.co/L2iQcDw2Qm
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
शहरात गेली अनेक दिवसापासून लसीकरण मोहीम ठप्प आहे .यासंदर्भात नगरसेवक सुरेश पाटील यांनी पाच स्मरण पत्र दिले होते.लसीचा पुरवठा का होत नाही ? लसीकरण मोहीम युद्धपातळीवर का राबवली जात नाही ? लसीकरणामध्ये शहर मागे आहे. लसीचा मुबलक पुरवठा होतो का नाही ? यासंदर्भात स्मरणपत्र देऊनही माहिती देण्यास आयुक्तांनी टाळाटाळ केली. त्यामुळे गुरुवारी (ता. ८) दुपारी दीड वाजता याचा जाब विचारण्यासाठी पाटील महापालिका आयुक्तांच्या दालनात भेटण्यासाठी आले.
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन, या लिंकवर करा अर्ज https://t.co/8juXtyJYKF
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बार्शीच्या सुविधा हॉस्पिटलमध्ये तोडफोड, दोघांविरोधात गुन्हा दाखल https://t.co/qpaKnXQRMb
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
मात्र पालिका आयुक्त नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या दालना बाहेरच ठिय्या मारला. अतिरिक्त पालिका आयुक्त खोराटे यांनी पाटील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण जोपर्यंत आयुक्त येत नाही तोपर्यंत मी उठणारा नाही, अशी भूमिका पाटील यांनी घेतली. त्यामुळे तब्बल पाच तास पाटील यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या मारला. त्यानंतर दोंघामध्ये चर्चा सुरू झाली चर्चेदरम्यान दोघांचाही संयम तुटला. पालिका आयुक्तांनी तुमच्या मोदींनी मला पुरवठा केला नाही तर मी काय खिशातून लस देऊ का, असा संतप्त सवाल पाटील यांना केला. त्यामुळे पाटील यांचा पारा चडला आणि त्यावरून दोघांमध्ये शाब्दीक चकमक झाली. तब्बल अर्धा तास ही खडाजंगी चालू होती. यामुळे आयुक्तांच्या दालनातील वातावरण प्रचंड गंभीर झाले होते.
'कोणीही नाराज नाही; मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका', यांचा पारा वाढला https://t.co/VLPMVcK69l
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
सुरेश पाटील यांनी नुकतेच सर्वसाधारण सभेत वसाहतीतील अतिक्रमणावरुन पालिकेत गोंधळ घातला होता. यावेळी महापौरांनी शांत राहण्याच्या वारंवार सूचना करुनही ऐकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या एक दिवसाकरिता निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर महापौरांनी पालिका निधीतून पाडलेले घरे बांधून देण्यासाठी मदतीची घोषणाही केली होती.
“लसीकरणा संदर्भात आयुक्तांना मी अनेक पत्र दिले की, त्याची माहिती अद्याप आयुक्तांनी मला दिली नाही. त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी गेलो असता लोकप्रतिनिधींना त्यांनी उर्मट भाषा बोलत अपमानास्पद वागणूक दिली. लसीसाठी आयुक्तांनी काय पाठपुरावा केला याचा पर्दाफाश आपण पालकमंत्र्यांसामोर समोर करणार आहे”
सुरेश पाटील – माजी सभागृह नेते