मुंबई : मुंबईत आज शनिवारी (९जुलै) लसीकरण बंद राहणार असल्याचे वृत्त आहे. कोरोनावरील लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे आज शनिवारी मुंबईतील शासकीय व महापालिका केंद्रांवर लस मिळणार नाही. लसीचे डोस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना त्यासंदर्भात सूचना दिली जाणार आहे. दरम्यान लसीच्या पुरेशा साठ्याअभावी अनेक शहरात लसीकरणात अडथळे येत आहेत. त्यात भर म्हणजे पुढील दोन दिवस लस येण्याची शक्यताही कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हाच लसीकरण मोहीम सुरू होईल, असे मुंबई पालिका प्रशासनाकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे.
'कोणीही नाराज नाही; मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका', यांचा पारा वाढला https://t.co/VLPMVcK69l
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून काही प्रमाणात घट झाल्याची समाधानकारक बाब आहे. मात्र हे जरी खरं असलं तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण, असं तज्ज्ञांच्या वतीनंही वारंवार सांगितलं जात आहे. देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. अशातच मुंबईतही १६ जूनपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत मुंबईकरांनी लसीकरणाराला चांगला प्रतिसाद दिला आहे. या आठवड्यात केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे मुंबईतील लसीकरण मोहीम थंडावली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग https://t.co/mYOoRTue7d
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 8, 2021
देशात तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने देशभरात लसीकरण मोहीमेनं वेग घेतला आहे. परंतु, पुरेशा लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या मुंबईतही लसीकरण मोहीमेमध्ये अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळेच आज शुक्रवार, ९ जुलैला मुंबईतील शासकीय आणि महापालिका केंद्रांवरील लसीकरण बंद ठेवले जात आहे. ही मुंबईकरांसाठी वाईट बातमी आहे.
काल गुरुवारी मुंबई महापालिकेच्या २८३ केंद्रांवर जेमतेम १४ हजार लोकांना लस देण्यात आली. तर खासगी लसीकरण केंद्रांमध्ये २८ हजार लोकांना लस देण्यात आली. सरकारच्या २० केंद्रांमध्ये एक हजार ६०० लोकांना लस देण्यात आली. म्हणजेच एकूण ४५ हजार लोकांना लस देण्यात आली.
@mipravindarekar Sir,
One request Stop private Vaccination in Mumbai ,free slots is not at all available, in same day private is available WHY.— hmpmatrix@gmail.com (@hmpmatrix786) July 9, 2021
* केंद्राकडून आर्थिक राजधानीला मर्यादित साठा
देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत ५९ लाख २९ हजार १९० नागरिकांनी लस दिली आहे. गेले काही दिवस लसींचा साठा सुरळीत सुरू असल्याने दररोज सरासरी एक लाखाहून अधिक नागरिकांना लस मिळत होती; मात्र या आठवड्यात केंद्राकडून आर्थिक राजधानी मुंबईला मर्यादित साठा उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहीम मंदावली आहे. काल गुरुवारी (ता. ८) काही मोजक्याच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.