अकोला : शहरापासून काही अंतरावर असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर गुरुवारी (ता. 8 जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यात चौघांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त कार शेगावहून वाशिमच्या दिशेनं जात होती. या कारला समोरून येणाऱ्या एका ट्रकनं जोरदार धडक दिली. धनंजय नवघरे, विशाल नवघरे, मंगेश नामदेव राऊत व चालक शुभम कुटे अशी मृतांची नावे आहेत.
प्रकाश आंबेडकर ICU मध्ये, तातडीने बायपास सर्जरी, ऐका मेडिकल बुलेटिन https://t.co/3DNiaGRhZF
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
रिधोरा येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हा भीषण अपघात झाला. रिधोरा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगात असलेले ट्रक आणि कार यांची धडक होऊन हा अपघात घडला. घटनास्थळावर कारचा अक्षरशः चुराडा झाल्याचे पाहायला मिळाला. अपघातात मृत्यू झालेले सर्वजण वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे येथील रहिवासी असल्याचे वृत्त आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंकजा मुंडे भावूक, नाराज नसल्याचे स्पष्टीकरण; भागवत कराडांचा आला होता फोन
https://t.co/IVhdFvbanM— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
एक कार शेगावकडून वाशिमच्या दिशेने जात होती. कार रिधोरा नजीक रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आली. याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका भरधाव ट्रकने कारला जोरदार टक्कर दिली. यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भीमा कोरेगाव : दोषारोपपत्रात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटेंचं नाव नाही, शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार https://t.co/CRgfdQio2T
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
घटनास्थळावर प्रथम पोहोचलेल्या काही प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले की, अपघात भीषण होता. कारचा चुराडा झाला होता. तर कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. एकजण गंभीर जखमी होता. त्याला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. बाळापूर पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून, तपास सुरु आहे.
मुंबईकरांसाठी वाईट बातमी, आर्थिक राजधानीत आज लसीकरण बंद https://t.co/u22rvbpYZf
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021