विम्बल्डन स्पर्धेत महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या २६ वर्षीय अॅशली बार्टीने बाजी मारली आहे. बार्टीने झेक प्रजासत्ताकच्या २९ वर्षीय प्लिस्कोवाला हिला ६-३ , ६-७, ६-३ अशा फरकाने नमवले. ऑस्ट्रेलियाकडून विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी गेल्या ४१ वर्षांतली बार्टी ही पहिलीच महिला खेळाडू आहे. दरम्यान, बार्टीने २०१५-१६ मध्ये क्रिकेटच्या मैदानातही नशीब आजमावले आहे. बार्टीने अंतिम सामन्यात कॅरोलिना प्लिस्कोवाचा ६-३, ६-७ (४-७), ६-३ असा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या अॅशली बार्टीने विम्बल्डनचे जेतेपद पटकावले. तीन सेट चाललेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिने कॅरोलिना प्लिस्कोवाचा पराभव केला. विम्बल्डनचे जेतेपद पटकावण्याची ही बार्टीची पहिलीच वेळ ठरली.
Destiny fulfilled 🇦🇺@AshBarty is our new Ladies' Singles Champion 🏆#Wimbledon pic.twitter.com/Yeh7wldDuv
— Wimbledon (@Wimbledon) July 10, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच विम्बल्डन जिंकणारी बार्टी ही एकूण तिसरी आणि तब्बल ४१ वर्षांत पहिली ऑस्ट्रेलियन महिला टेनिसपटू ठरली. तिच्याआधी मार्गारेट कोर्ट आणि एवोनि गुलागोंगने यांनी विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती.
अंतिम सामन्याची चांगली सुरुवात करताना बार्टीने पहिला सेट ६-३ असा मोठ्या फरकाने जिंकला. परंतु, प्लिस्कोवाने दमदार पुनरागमन करत दुसरा सेट टाय-ब्रेकरमध्ये जिंकत सामन्यात बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये बार्टीने पुन्हा तिचा खेळ उंचावला. तिने ४-१ अशी मोठी आघाडी मिळवली आणि प्लिस्कोवाला पुनरागमन करणे जमले नाही. बार्टीने हा सेट ६-३ असा जिंकत विम्बल्डनचे जेतेपद पटकावले.
अभिनेते चंकी पांडे यांना मातृशोक https://t.co/FbqPzL3lH9
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021