नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्या. त्यानंतर त्या आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डाही उपस्थित आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत वर्तवली जात आहे.
'अमित शहा येतायत, दारे खिडक्या बंद ठेवा', सोसायटींच्या अध्यक्षांना पत्र https://t.co/BVUMo9vIL1
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठक बोलावली होती. त्यामुळे पंकजा मुंडे या दिल्लीत दाखल झाल्या होत्या. मात्र, पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्याने चर्चांना उधाण आलं होतं. दिल्लीत नड्डा यांच्यासोबतची बैठक पार पडल्यानंतर पंकजा मुंडे या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डा, विनोद तावडे आणि पक्षाचे इतर राष्ट्रीय सचिवही उपस्थित आहेत.
जागतिक लोकसंख्या दिन : दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना ना नोकरी, ना भत्ता, हे असतील बंधने https://t.co/G2vmKLFMtB
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाजपच्या सर्व राष्ट्रीय सचिवांशी चर्चा करणार आहेत. आगामी उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी या सचिवांशी संवाद साधणार आहेत. पक्षाची संघटनात्मक बांधणी, सरकार म्हणून केलेली कामे, याबाबत या सचिवांशी मोदी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येतं.
एकनाथ खडसे काढणा-या सीडीची राज ठाकरेंना प्रतीक्षा, आरक्षणावर काय म्हणाले ? https://t.co/2wlazLaQDg
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 11, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात प्रीतम मुंडे यांचा समावेश होणार असल्याचा अंदाज होता. मात्र, प्रीतम मुंडेंऐवजी त्यांच्याच भागातील डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा झडत होत्या. त्यावर पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन खुलासाही केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंकजा मुंडे भावूक, नाराज नसल्याचे स्पष्टीकरण; भागवत कराडांचा आला होता फोन
https://t.co/IVhdFvbanM— Surajya Digital (@SurajyaDigital) July 9, 2021
मात्र, कालपासून पंकजा समर्थकांनी अचानक राजीनामाअस्त्र उपसल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. त्यातच पंकजा मुंडे यांना अचानक दिल्लीत बोलावले आहे.
* समर्थकांचे राजीनामाअस्त्र
पंकजा यांच्या 49 समर्थकांनी विविध पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंकजा यांनी समर्थकांची मुंबईत बैठक बोलावली आहे. येत्या मंगळवारी ही बैठक होणार असल्याचं भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी सांगितले. तसेच त्या भाजप सोडणार असल्याची चर्चा आहे.
भाजपला मोठा धक्का; 25 जणांचा राजीनामा, ताईंनी वेगळा निर्णय घ्यावा https://t.co/jd7HFGWBCO
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 10, 2021
त्यामुळे पंकजा काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय. बीडमधील भाजप पदाधिकारी नाराज असून जिल्ह्यातील सर्वच भाजप तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिलाय. यामध्ये परळीसह एकूण 11 तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याने हे पदाधिकारी नाराज आहेत. नाराज पदाधिकाऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. या 11 तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर ही संख्या आता 25 वर पोहोचली आहे