पुणे : पुणे जिल्ह्यात अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार घडला आहे. शिरुर तालुक्यातील पाबळ गावच्या स्मशानभूमीत 2 दिवसापूर्वी एका काळ्या पिशवीमध्ये कोहळ्याला एका मुलीचा फोटो टाचणीच्या साह्याने टोचण्यात आला होता आणि त्यावर कुंकू लावण्यात आले होते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उद्या दहावीचा निकाल, येथे पाहा, शिक्षणमंत्र्यांचा ट्वीट व्हिडिओ पहा https://t.co/HQAKeO8lob
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
फोटोमध्ये असलेली मुलगी कोण आहे, हा प्रकार काय आहे, कोणी केला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आता पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील पाबळ येथील स्मशानभूमीत हा अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. एका काळ्या पिशवीमध्ये त्यावर कोहळ्याचा भोपळा त्यावर टाचणी टोचून एका मुलीचा फोटो व तिथे काही वस्तू निदर्शनास आले आहेत. तेथे गेलेल्या लोकांना आढळून आल्याने हा प्रकार समजला. ही माहिती वा-यासारखी पसरली. याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
फ्लॅटमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिला एजंटला अटक https://t.co/qbMMoGUtO1
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आईने बाळाचा जीव वाचवण्यासाठी 2 वर्षाच्या मुलीला इमारतीतून खाली फेकले, पहा तो व्हिडिओhttps://t.co/eqTxBn2sIL
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
हा प्रकार लोकांच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी तेथील स्थानिक माध्यम प्रतिनिधींना संपर्क साधला. या प्रकाराची माहिती देण्यात आली. याबाबता बोलताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रतिनिधी म्हणाल्या की करणी करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीचे वाईट व्हावे या उद्देशाने उतारे टाकण्यात आलेले असतात, परंतु त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे वाईट होत नसल्याचे नंदिनी जाधव यांनी सांगितले. उतारे टाकणाऱ्या लोकांमध्ये एक प्रकारची विकृती असते. यामुळे अशी कृत्ये केली जातात. त्यामुळे गावातील लोकांना एवढेच सांगणे आहे की अशा लोकांना कोणी घाबरून जाऊ नये. या लोकांचा शोध घेऊन पोलिस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, असे आवाहन केले.
विद्यार्थ्याने बनवली सौरऊर्जेवर चालणारी सायकल, 1.50 रुपयांत 50 किमी धावणार https://t.co/1R4TIbSFWN
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
* असा प्रकार निदर्शनास आला
पाबळ गावच्या स्मशानभूमीत दोन दिवसांपूर्वी काळ्या पिशवीत कोहळ्याला एका मुलीचा फोटो टाचणीच्या मदतीने टोचण्यात आला होता आणि त्यावर कुंकू लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गावातील काही लोक दशक्रिया विधींसाठी स्मशानभूमीत गेले असता हा सगळा प्रकार त्यांच्या नजरेस पडला. यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील या बँकेचा परवाना रद्द, बुधवारपासून व्यवसाय बंद https://t.co/zWpY3cDv73
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
पाबळ गावात काही लोक स्मशानविधीसाठी गेले होते. तिथे त्या लोकांना कोहळ्याला एक फोटो दिसला. लोक घाबरले आहेत. मात्र या कृतीने घाबरून जाऊ नये असंही आवाहन अंनिसने केलं आहे. या प्रकरणी पोलीस आता पुढे तपास करत आहेत. त्या भागात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे हे सगळं कुणी केलं आहे, याचा शोध घ्यावा आणि संबधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी अंनिसने केली आहे.