डर्बन : दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब जुमा यांना तुरूंगात टाकल्यानंतर हिंसा भडकली. यावेळी एका आईने तिच्या 2 वर्षाच्या मुलीला वाचवण्यासाठी इमारतीतून खाली फेकले. खाली उभ्या असलेल्या लोकांनी तिला सुरक्षित पकडले. या हिंसाचारात 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राष्ट्रपती सिरिल रामाफोसा यांनी याला 1990 नंतरचा सर्वात भयंकर हिंसाचार म्हटले आहे.
This was too painful to watch💔💔 pic.twitter.com/WL964kZUWH
— KATLEGO (@Katlie_Moo) July 13, 2021
सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये एका आईने आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्याच्या आगीने धगधगत्या इमारतीतून खाली फेकले. खाली उभे असलेल्या जमावाने एकत्र येऊन त्या निरागस दोन वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले. डर्बनच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की बहुमजली इमारतीला आग लागली आहे.
जीवघेण्या स्पर्धेत झोपेच्या गोळ्यांचा व्यापार नऊ अब्ज डॉलरवर, आपल्या झोपेचे खोबरे होऊ देवू नका (ब्लॉग) https://t.co/M9e8hbmjQT
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
मागील आठवड्यात माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना तुरूंगवास भोगावा लागला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेतील हिंसाचार आणि दंगल उसळली होती. यात 72 लोक ठार आणि 1 हजार 234 लोकांना अटक करण्यात आली होती. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली आहे. अनेक ठिकाणी दुकानांची तोडफोड झाली. गोदामांना आग लावण्यात आली.
Captured one those images that will forever live in my heart. Amongst the chaos there were heroes today, they caught her and she is fine. @nomsa_maseko pic.twitter.com/YX8KTap8ct
— Thuthuka Zondi (@ThuthukaZ) July 13, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आगीत इमारतीत असलेली महिला ही जोरात ओरडत आहे. आई आपल्या मुलीबरोबर तिथे अडकलेली दिसत आहे. तिला काय करावे याची काही कल्पना नाही. अचानक ती तिच्या मुलीला खाली उभ्या असलेल्या लोकांकडे फेकते. हे सर्व तिला आणि तिच्या मुलीला वाचविण्यासाठी प्रयत्न करताना आणि ओरडताना दिसत आहेत. गर्दीतील लोकांनी एकत्र येऊन त्या मुलीला वाचवले.
विद्यार्थ्याने बनवली सौरऊर्जेवर चालणारी सायकल, 1.50 रुपयांत 50 किमी धावणार https://t.co/1R4TIbSFWN
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 15, 2021
बीबीसीशी बोलताना या महिलेने सांगितले की मी घाबरले होते, खरोखरच घाबरले होते, पण खाली रस्त्यावर लोक होते. लोक ‘फेकून द्या, फेकून द्या’ अशी ओरड करीत होते. जाळपोळ दरम्यान धूर होता म्हणून माझ्या लहान मुलीला माझ्यापासून दूर नेण्याचा मला कुणावर विश्वास नव्हता. या महिलेने रॉयटर्सला सांगितले की तिच्या मुलीला दुखापत झाली नाही आणि घटनेनंतर लवकरच आई आणि मुलगी पुन्हा एकत्र आले.
पण एका क्षणी आपल्या मुलीला फेकल्यावर ती घाबरली होती. आपण मुलीला फेकले पण खाली असलेल्या लोकांनी तिच्या मुलीला पकडले आहे की नाही, अशी भीती तिच्या मनात होती. त्यांच्या मते, माझ्या मुलीसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिस्थितीतून बाहेर पडणे होते. पुढे धोका होता, हे मला माहीत होते, मात्र मला फक्त तिचा जीव वाचवायचे होते.