दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा आणि सीना नदीच्या पात्रात बंधारे बांधून ठिकठिकाणी पाणी अडवून ते शेतीसाठी वापरण्याकरिता आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज सोलापुरातील बैडकीत दिले.
सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात जलसंपदामंत्री पाटील यांनी दक्षिण सोलापूर, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यातील पाणी नियोजन, वापर आणि सिंचन नियोजनासाठी बैठक घेतली. यावेळी काँग्रेसचे नेते डाॅ.बसवराज बगले, राष्ट्रवादीचे नेते प्रा.सुभाषचंद्र बिराजदार, अप्पाराव कोरे,तालुका अध्यक्ष सुभाष पाटील, विलास लोकरे, निंगोडा तळे,बसवराज विभुते, अल्लाऊदीन मकानदार, योगिराज विभुते, यलप्पा बनसोडे यांची उपस्थिती होती.
स्मार्टसिटीमुळे सोलापूरची स्वप्नपूर्ती; स्मार्ट सिटी विभागात दररोज एक – दीड तास पाणीपुरवठा https://t.co/HBtCJhMjc4
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021
वडापूरपासून वरच्या भागात भीमेचे पाणी अडवून ते सिंचनासाठी वापरता येते. त्यासाठी वडापूर येथे 4 टीएमसी पाणी साठवण क्षमतेचे धरण होणे आवश्यक आहे, अशी मागणी करण्यात आली. मात्र लवादाची मान्यता मिळत नसल्याने तांत्रिक अडचण येते, शिवाय कर्नाटक सरकारचा विरोध होतोय, अशी भूमिका अधिक्षक अभियंता जयंत शिंदे,कार्यकारी अभियंता जोशी, वाडकर आदिंनी मांडली. यावर तोडगा काढण्यासाठी मोहोळपासून दक्षिण सोलापूरच्या वडापूरपर्यंत चार मीटर ऊंचीचे अर्धा टीएमसी क्षमतेचे लहान बॅरेजेस बांधण्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी सुचविले. पाणी तंटा लवादाची पाणी उपलब्धतेची तांत्रिक अडचण असल्यास नैसर्गिक पावसाचे पाणी नदीच्या पात्रातच अडविणे शक्य आहे, अशी भूमिका बसवराज बगले यांनी मांडली. शिवाय कर्नाटक सरकारकडून सध्या बंधारे बांधण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, पवारांनी ट्वीटद्वारे दिली माहिती, सहकार आणि बँकिंग क्षेत्राबद्दल चर्चा ?https://t.co/KGu1oLfyww
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 17, 2021
आमदार संजय शिंदे, मोहोळचे आमदार यशवंत माने, जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दिपक साळुंखे यांनी यास दुजोरा दिला. त्यानुसार टप्प्याटप्प्याने बॅरेज निर्मिती करून पाणी वाटप करण्याचे नियोजन करता येईल त्यासाठी आराखडा तयार करा, अशी सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला दिली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सुभाष पाटील यांनी वडापूर बंधारा निर्मितीसह अनेक निवेदने सादर केली. दादा कोरे यांनी मंद्रुप गावतलावात पाणी सोडण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
* बडकबाळ येथे बॅरेज होणार
वडकबाळसह येथे सीना नदीच्या पात्रात पाणी साठविण्यासाठी चार बॅरेज बांधण्याची मागणी प्रा.सुभाषचंद्र बिराजदार आणि विलास लोकरे यांनी केली, त्यानुसार त्वरीत पाहणी करून अहवाल सादर करण्याची सूचनाही मंत्री पाटील यांनी केली. याशिवाय राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली पाणी अडवून साठवण्यासाठी राजमार्ग प्रधिकरणाकडे पाठपुरावा करण्याबाबत अधिक्षकांना सांगितले.
वेळापूरने धोक्याची पातळी ओलांडली, जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांची गावाकडे धाव, होम आयसोलेशन बंद करून आयसोलेशन सेंटर सुरू करा https://t.co/Zg380jeSO8
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
* भंडारकवठेचा बंधारा दुरूस्ती करा
भंडारकवठे येथे भीमा नदीवर 45 वर्षापूर्वी बांधलेल्या पूर नियंत्रक बंधारा खचला आहे. त्याची दुरूस्ती करून ऊंची वाढविण्याची मागणी सतत ग्रामपंचायतीने केली आहे. मात्र याकडे दूर्लक्ष होत आहे. मोठा महापूर आल्यास भंडारकवठेसह 10 गावांना पुराचा धोका होवू शकतो, याकडे डाॅ.बसवराज बगले आणि प्रथमेश पाटील यांनी लक्ष वेधले. याबाबत तपासणी करून तात्काळ अहवाल देण्याबाबत अधिक्षक अभियंता शिंदे यांना लेखी आदेश दिले.
या फोटोला कॅप्शन सुचवा, इंधन दरवाढीने जनता त्रस्त झाल्याचे काही छायाचित्रे #surajyadigital #FuelPriceHike #इंधनदरवाढ #सुराज्यडिजिटल #caption #images #pepole pic.twitter.com/OZWB2vAmsB
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021