मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा अदानी समूहाने घेताच कंपनीचे मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवण्यात आले आहे. यावर अदानींनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. त्यात महाराष्ट्राला डिवचण्यासाठी विमानतळावर गरबा डान्स केला. यावर मनसेनेने अदानी समूहाला चांगलाच झिंगाट दाखवण्याचा इशारा दिला आहे.
राज्यात राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओवरुन मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी अदानी समूहाला थेट झिंगाट इशारा दिला आहे.
एकीकडे नवी मुंबई विमानतळाचा वाद सुरु असताना आता अदानीने सुत्र हाती घेतल्यानंतर हे महत्वाचं पाऊल उचललं आहे. यामुळे राजकीय तणाव पसरत आहे. मुंबईच्या विमानतळाचा ताबा आता जीव्हीके कडून पूर्णपणे अदानी कंपनीकडे गेला आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती.
https://twitter.com/hvgoenka/status/1416444239546753026?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1416444239546753026%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे. अदानींच्या या निर्णयामुळे एक मोठी कंपनी आता पुन्हा मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट झाली आहे. कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची अजब आणि महाराष्ट्राल न पटणारी प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबई विमानतळाचा ताबा हा अदानी कंपनीकडे जाणार याची चर्चा सुरु असतानाच केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका झाली होती. त्यानंतर १३ जुलैला रोजी या विमानतळाचा ताबा अदानी समूहाला मिळाला. त्यानंतर आठवड्याभरातच विमानतळाचं मुख्यालय हे अहमदाबादला हलवण्यात आलं आहे. मुंबई विमानतळावर सोमवारी दांडियाच्या गाण्यावर करण्यात आलेल्या फ्लॅशमॉबवरही टीका झाली होती.
नवी मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाला मिळाल्यानंतर माजी आमदार आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलं आहे. विमानतळ मुंबईमध्येच आहे. त्यामुळे आम्हाला डीवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल, असा इशारा मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिला आहे.
फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय …
विमानतळ मुंबईमध्येच आहे ….
आम्हाला डीवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल…— Nitin Sardesai (@1nitinsardesai) July 20, 2021
काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर अदानी उद्योग समुहाचे कर्मचारी गरबा करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर मुंबईतले उद्योग गुजरातला नेण्याचा हा डाव असल्याची चर्चा सुरु झाली. मनसेनेही या वादात उडी घेऊन, फक्त व्यवस्थापन अदानीकडे गेलंय. विमानतळ मुंबईतच आहे. आम्हाला डिवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल असं ट्वीट नितीन सरदेसाई यांनी केलं आहे.