मुंबई : घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश उर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले आहेत. मोबाईल सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रुपात हे स्मार्ट मीटर असतील. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्रि पेड मीटरमध्ये तर जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येणार आहे. यामुळे वीजबजतीला गती मिळणार आहे.
घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रीडिंग बाबतच्या एकनाअनेक तक्रारी ऊर्जा विभागाकडे येतायात. यावर तोडगा काढण्यासाठी वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद यासारख्या महानगरात प्राथमिक स्तरावर स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. याचा उपयोग, रिझल्ट पाहून त्यानंतर राज्यभर असे स्मार्ट मीटर बसवले जावू शकतात.
स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी याबाबत आज निर्देश दिले आहेत.
राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर राज्य सरकार देणार आहे . यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी दिल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या महत्त्वाच्या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (वित्त) रविंद्र सावंत, महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर उपस्थित होते.
* वीज बिलातील त्रुटी होणार दूर
मोबाइलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्री पेड मीटर मध्ये तर जितके पैसे जमा आहेत, त्यानुसारच वीज वापरता येईल. परिणामी विजेची बचत होण्यास यामुळे फायदा होईल.
स्मार्ट मीटरमुळे वीज बिलातील त्रुटी दूर होतील. व्यवस्थित आणि बिनचूक बिल येईल. मीटरमध्ये फेरफार करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल. यामुळे वीजचोरीस आळा बसेल. या स्मार्ट मीटरची कल्पना जरी चांगली वाटत असली तरी प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झाल्यानंतर हे कितपत यशस्वी होणार हे कळणार आहे. त्यानंतर या यंत्रणेची व्याप्ती वाढणार आहे.