मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या फौजिया खान यांच्या निवासस्थानी ईदनिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे असे अनेक नेत्यांनी ईद पार्टीला उपस्थिती लावली. या ईद फोटोंवर नेटकरी संताप व्यक्त करत आहे. राज्यात पुरस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्नेहभोजन करण्यात गुंतलेत, असा संताप नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावर टीका- टीप्पणी होत आहे.
राज्यात भयावह पुरस्थिती निर्माण झाली असताना आणि कोकणातील चिपळूणमध्ये पुरामुळे आणीबाणी निर्माण झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते स्नेहभोजनात व्यस्त आहेत. त्यांना घास तरी कसा गोड लागत असेल, अशी नेटकरी टीका करत आहेत. हे आहे अनुभवी सरकारच गांभीर्य, तिकडे पुरात लोकांना खायला अन्न नाही पण इकटे पार्ट्या चालू आहेत, अशी टीका काही नेटिझन्सनी करत आहेत.
गेल्या दोन तीन दिवसांपासून कोकणासह महाराष्ट्रातील मुंबई, सांगली, कोल्हापूर, सातारा, नागपूर अशा बहुतांश भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यात चिपळूण शहराचा बहुतांश भाग पुराच्या पाण्याखाली गेला आहे. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने या ठिकाणी हेलिकॉप्टर सुविधा पोहोचविण्याचे तातडीने आदेश दिले आहेत. तसेच NDRF च्या दोन टीम रवाना झाल्या आहेत. कोस्टल गार्डच्या मदतीने बोटी सुद्धा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. फूड पॅकेट्स व इतर वैद्यकीय सहकार्य उपलब्ध केले जात आहे. चिपळूण शहरात 5 हजार लोक अडकले आहेत. अनेक घरात पाणी शिरले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईजवळील बदलापूर, उल्हासनगरसह ठाणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भाग जलमय झाला आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्येही पुराचे संकट दिसून येत आहे. मात्र राज्यात अशी आणीबाणीची परिस्थिती असताना राज्यातील सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते ईदची पार्टी करण्यात व्यस्त असल्याने संताप व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या फौजिया खान यांच्या निवासस्थानी ईदनिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील, प्रफुल्ल पटेल, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे हे उपस्थित होते. दरम्यान, स्नेहभोजन झाल्यानंतर फौजिया खान यांनी ट्विटरवर या स्नेहभोजनाचा फोटो शेअर केला होता. आता याच फोटोवर नेटिझन्सनी टीकेची झोड उठवली आहे.
आज तिथे चिपळूणची परिस्थिती बघून इथे जेवण करायचं सुद्धा मन झालं नाही. अर्धा महाराष्ट्र आज पाण्याखाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. संध्याकाळनंतर वाशिष्ठी नदीची पातळी वाढली त्यामुळे चिपळूण बाजारपेठेत शिरलं पाणी, वड नाका, टिळक वाचनालय या परिसरात रस्त्यावर पाणी पाहायला मिळाले आहे. घाटमाथ्यावर झालेला मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे चिपळूण बाजारपेठेत पाणी शिरलं आहे त्यामुळे रात्र चिपळूणकराना जागून काढावी लागली.
चिपळूण, कोल्हापूरमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे आणि इथे पार्टी वगैरे चालू आहेत. पावसामध्ये फक्त निवडणुकीमध्ये भिजायचं, बाकी दिवस जनतेला उगड्यावर सोडून द्यायचं, असा टोलाही एका युझरने लगावला आहे.