सोलापूर : शहरात सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्यामध्ये कोरोना पाठोपाठ आता डेंग्यूने देखील तोंडवर काढले आहे. आत्तापर्यंत 250 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. 90 ते 92 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असताना महापालिकेचा आरोग्य विभाग ढिम आहे. राज्यातही रुग्णांची संख्या हजारावर गेली असून पाचजण दगावले आहेत.
डेंगूच्या उपाययोजना संदर्भात फवारणीसाठी, धुळारणी ठप्प आहे. फॉगिंग मशीन डिझेल आणि पेट्रोल अभावी धूळखत पडून आहेत. पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी पैसे नसल्याची वास्तव पुढे आले आहे. गेली दोन वर्ष झाले शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे. कोरोनामुळे अनेक रुग्णाचा मृत्यू झाला आहे, असे असताना कोरोना पाठोपाठ डेंगू या साथीच्या रोगाने देखील आता थैमान घातले आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. गेल्या महिन्यामध्ये 250 संशयित रुग्ण आढळले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याच्यामध्ये 90 ते 92 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. डेंगूमुळे जरी अद्याप एकही रुग्ण दगावला नसल्याची दिलासादायक बाब असली तरी महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र उपाययोजना करण्यासंदर्भात ढिम्म असल्याचे दिसून येत आहे.
गतवर्षी लाखो रुपये खर्च करून फॉगिंगसाठी खरेदी केलेल्या लहान 22 आणि मोठ्या 5 फॉगिंग मशीन धुळखात पडुन आहेत. ज्या कंपनीकडून खरेदी केल्या त्या कंपनीने मेटेनन्स करून तीन ते चार दिवसाचा कालावधी लोटला मात्र अद्याप कोणत्याही भागात धुळारणी चालू नसल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत विचारणा केली असता फॉगिंग मशीन चालू करण्यासाठी लागणारे डिझेल आणि पेट्रोल खरेदीसाठी पैसेच नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत त्या भागात फवारणीसाठी गेलेल्या या मशिन चालू झाल्यास नाहीत, असा प्रकार महापालिकेच्या दस्तुरखुद्दद आरोग्य अधिकारी यांच्या बाबतीत घडला आहे.
डेंगू साथीच्या रोगावर आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रणादेखील उभी केली आहे. झोन निहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक झोनला दोन ते तीन फॉगिंग मशीन देण्यात आले आहेत. प्रत्येक टीममध्ये दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्याशिवाय जिल्हा हिवताप उपक्रम यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मात्र फॉगिंग मशीन चालू करण्यासाठी डिझेल पेट्रोलचे नसल्याने हा पेच निर्माण झाला आहे. या संदर्भात उपायुक्त धनराज पांडे यांनी पैशासंदर्भात पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा चालू केला असल्याची माहिती मिळत आहे.