नवी दिल्ली : अख्या जगात काल गुरुवार (22 जुलै) संध्याकाळपासून तब्बल 29 हजार वेबसाईट्स डाऊन झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहक वैतागले आहेत. अचानक या वेबसाईट्स काम करत नसल्याने युजर्स पुरते वैतागलेत. जो तो सोशल मीडियावर याविषयी संताप व्यक्त करत आहेत. रात्री उशिरा तांत्रिक बिघाड ठिक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बिघाड दुरुस्त करुनही काही ठिकाणी समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान Paytm, Zomato, Sony Liv, Hotstar यांच्या युजर्सनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. Paytm, Zomato, Sony Liv, Hotstar, प्ले स्टेशन नेटवर्क यांसारखी अनेक ॲप्स काल गुरुवारी संध्याकाळपासून डाऊन झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इंटरनेट डाऊन झाल्यानं अमेझॉन, झोमॅटो आणि पेटीएमसह जगभरातील हजारो वेबसाईट्स गुरुवारी (22 जुलै) ठप्प झाल्या. सोनी लिव , हॉटस्टारसारखे ओटीटी प्लॅटफार्मवर देखील युजर्सला अडथळे आले. बहुतांश कंपन्यांच्या वेबसाईटचा वेग कमी झाला किंवा पूर्णपणे बंद झाल्या. पेटीएमसारख्या ॲपवर पेमेंट होण्यात अडचणी आल्या. याशिवाय अनेक बँक, टेक कंपन्या आणि एअरलाईन्सचाही यात समावेश आहे.
इंटरनेट आउटेज ट्रॅकर डाउनडेक्टरच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नऊ वाजल्यापासून ही सर्व ॲप्स डाउन झाली. पाच मिनिटांमध्ये एकट्या झोमॅटोच्या ॲपवर तीन हजार लोकांना वापरता येत नव्हतं.
याच प्रकारच्या अडचणी इतरही काही सेवा देणाऱ्या ॲप्सच्या बाबतीत पहायला मिळाल्या.
या आउटेजमध्ये NDTV च्या वेबसाईट्सना फटका बसला. असं सांगितलं जात आहे की, ही समस्या अकामाई इन्फ्रास्ट्रक्चरमुळं झाली आहे. हे इंटरनेटचा महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रदान करते. डाउनडेक्टरच्या माहितीनुसार, आउटेजचा परिणाम झालेल्या काही वेबसाईट्समध्ये लोकप्रिय गेमिंग ॲप स्टीम आणि पीएसएन, डिझ्ने, हॉटस्टार, झी ५ आणि सोनी लिव्ह सारख्या स्ट्रिमिंग सेवा आणि झोमॅटो, ॲमेझॉन आणि पेटीएम सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसचा समावेश आहे.
* नेमके डॉऊनचे कारण
हे सर्व कशामुळं झालंय याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नसल्याचे वृत्त आहे. पण काही बातम्यांमधून हे समोर आलंय की, ही समस्या अकामाई वेब इन्फ्रास्ट्रक्चरमुळे निर्माण झाली आहे.
आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउन डेटेक्टरनुसार डीएनएस म्हणजे डोमेन नेम सिस्टममध्ये (DNS) बिघाड झाल्यानं जगभरात वेबसाईट्स काही वेळेसाठी बंद झाल्या होत्या.
इंटरनेट आउटेजमुळे या कंपन्यांच्या वेबसाईट्स लोडच होत नव्हत्या. सिस्टम डोमेन नेम सिस्टम सर्विसमध्ये Error दिसत होती. क्लाउड सर्विस प्रोवाइडर कंपनी अकामाई टेक्नोलॉजीजने (AKAM.O) एज DNS सर्विसमधील बिघाड दूर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. गुरुवारी (22 जुलै) रात्री 10:17 वाजता कंपनीने ट्विट करत इश्यू रिसॉल्व केल्याचं सांगितलं जातंय.