मुंबई : कोकणात झालेल्या मुसळधार पावसाने तेथील लोकांचं आयुष्य विस्कळीत झालं आहे. अशा परिस्थितीत कोकणाला मदतीचा हात देण्याची विनंती मराठी अभिनेता भरत जाधव याने केली आहे. आपले कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरते नाही. या पूरसंकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या, असं म्हटलं आहे. यात सुके पदार्थ, किराणा सामान, महिला व पुरुषांची अंतर्वस्त्रे, अंथरुण-पांघरूण अशा मदतीची विनंती केली आहे.
ही पोस्ट शेअर करताना भरतने लिहिले आहे, “आपले कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरते नाही. या पूरसंकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या” या पोस्टमध्ये जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ, किराणा सामान, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर्वस्त्रे, अंथरुण-पांघरूण म्हणून वापरता येणारी जाड कपडे अशा विविध प्रकारे मदत करण्यासाठीची माहिती यावर दिलेली आहे. सोबतच संपर्क क्रमांकसुद्धा दिले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा कहर सुरुच आहे. महाड येथील तळीये गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरूवात होतानाच याठिकाणी विविध यंत्रणांमार्फत रेस्क्यू ऑपरेशनला सुरूवात झाली आहे. दरम्यान, पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. पण आपणही मदत केली पाहिजे.
तळई गावात दरड कोसळून तब्बल ३६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाड आणि चिपळूण शहरांमध्ये पूर आला असून शहरं पाण्याखाली गेली आहेत. तर पुरात व भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी व त्यांचं स्थलांतर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेशही दिले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १२९ च्या जवळपास लोकांचा मृत्यू झाला आहे.
अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्व धरणेही भरले आहेत. धरणे भरल्याने धरणाचं पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे नद्यांना पूर आला. सुसाटपणे वाहणा-या पाण्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. चिपळूण, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका बसला आहे. हे पाहता कोकणातील लोकांच्या मदतीसाठी अनेक लोक पुढे आले आहेत. आपल्या जागलेपणाच्या मनाचा ठाव घेत मराठी अभिनेता भरत जाधवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मदतीचे आवाहन केले आहे. ही पोस्ट शेअर करत ‘आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही. या पूर संकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या,’ असे कॅप्शन त्याने दिले आहे.