वेळापूर : नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेड प्रस्तावित द्रुतगती मार्ग मुंबई पुणे हैदराबाद लोकराज्य समाज विकास व संशोधन संस्था औरंगाबाद या संस्थेच्यावतीने बुलेट ट्रेनचा सर्वे सुरू असून हा सर्वे माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथून सुरू करण्यात आला, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी दिली.
यावेळी वेळापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच विमल जानकर, धानोरेचे सरपंच जीवन जानकर, पं.स. सदस्य अजय सकट, वेळापूरचे उपसरपंच जावेद मुलाणी, भाऊसाहेब जानकर, संजय देशपांडे, डाॅ. धनंजय जानकर आदी उपास्थित होते.
ही बुलेट ट्रेन मुंबई पुणे हैदराबाद यामार्गे जाणार आहे. या मार्गावरून जाणाऱ्या गावातील शेतकऱ्यांची चर्चा करून आणि अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत. या अडचणी लेखी स्वरूपात असणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर उत्तरमधील ८ गावे व सोलापूर दक्षिणमधील ४ गावे , अक्कलकोटमधील ९ गावे ,मोहोळ मधिल १० गावे , पंढरपूर मधील १८ गावे तर माळशिरसमधील १३ गावातील मार्ग व भूसंपादन करण्यात येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माळशिरसमधून तोंडले, धानोरे, उघडेवाडी, वेळापूर ,दत्तनगर ,चौंडेश्वरी वाडी, गिरझणी, बागेची वाडी ,कोंडबावी, चाकोरे, तिरवंडी, पळसमंडळ, बांगर्डे अशी गावे आहेत तर उत्तर सोलापूर मधून आठ गावे तेरे पाथरी बेलाटी कावठे सरगर वाडी प्रताप नगर सूर्य गाव कुमठे सोलापूर दक्षिण मधून चार गावे सावध खेड होडगे हनुमान गाव वळसंगी पंढरपूर मधून 18 गावे शेंडगेवाडी केसकरवाडी धोंडेवाडी भंडीशेगाव सुफली उपरी गाडेगाव कोर्टी टाकळी कासेगाव गोपाळपुर अनवली कोंढारकी राजणी सरकोली आंबे शंकरगाव पुुलंदवाडी मोहोळ म्हणून दहा गावे वडदेगाव कोठाळी सोहाळे वाघोली कुरुल कामती बुद्रुक लामणतांडा कामटे खुर्दे शिंगोळी तरडगाव अक्कलकोटमधून नऊ गावे करजाळ कोनाली हसापुर अक्कलकोट ग्रामीण ममदाबाद निमगाव हत्ती कणबस चिखाली सरगरवाडी या गावांमधून बुलेट ट्रेन धावणार आहे. यासाठी संशोधन मार्फत सर्वे चे काम सुरू करण्यात आले आहे.
सोलापूर दक्षिण उत्तर मोहोळ ते अक्कलकोट याचा सर्वे झाला आहे. उर्वरित माळशिरस व पंढरपूर हा सर्वे करण्याचे काम हाती घेण्यात आली आहे. या संपूर्ण सर्वेची माहिती उत्तमराव जानकर यांनी जाणून घेऊन सर्वचे काम वेळेत होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. हा सर्वे संस्थेचे समन्वयक अमोल जोगदंडे व नितीन नेमाने, किशोर कांबळे, मोहिन शेख हे करीत आहेत. उत्तमराव जानकर म्हणाले की या बुलेट ट्रेनमुळे लोकांची मोठ्या प्रमाणात सोय होऊन वेेळेची बचत होणार या ट्रेनमुळे विकासाचे पर्व सुरू होणार असल्याचे सांगितले.