बंगळुरु : बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर आज बुधवारी बसवराज बोम्मई (वय 61) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. लिंगायत समुदाय बसवराज हे शिग्गांव येथील भाजपचे आमदार आहेत. येडियुरप्पा यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. कर्नाटकचे 30 वे मुख्यमंत्री बनले आहे. तीन वेळा आमदार, गृहमंत्री ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. बसवराज यांनी 2008 मध्ये भाजपत प्रवेश केला होता. बोम्मई यांनी मॅकेनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी 3 वर्षे टाटा मोटर्समध्ये काम केले आहे.
बसवराज सोमप्पा बोम्माई असे त्याचे पूर्ण नाव आहे. कर्नाटकचे गृहनिर्माण, कायदा, संसदीय कार्यमंत्री असलेले बोम्माई यांनी हवेरी आणि उडुपी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री म्हणूनही काम पाहिले. यापूर्वी त्यांनी जलसंपदा व सहकार मंत्री म्हणून काम पाहिले आहे.
स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी, प्रभावी लिंगायत नेते, दीर्घ राजकीय अनुभव असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. येडियुराप्पांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी आज राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान आणि कर्नाटक भाजपचे प्रभारी अर्जुन सिंह उपस्थित होते.
बसवराज बोम्मई, 61, यांचा जन्म 28 जानेवारी 1960 रोजी हुबळी येथे झाला. माजी मुख्यमंत्री एसआर बोम्माई यांचा मुलगा बसवराज कर्नाटकमधील भाजपमधील एक बड्या नेत्यांपैकी एक आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यांनी 1982 मध्ये भुमरडी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातून बी.ई. बसवराज बोम्माई यांच्या पत्नीचे नाव चेन्नम्मा असून त्यांना दोन मुले आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला बसवराज बोम्मई यांना कर्नाटकचे गृहमंत्री केले गेले. ते 2004 ते 2008 पर्यंत कर्नाटक विधानसभेचे सदस्यही होते. 1998 आणि 2004 मध्ये ते धारवाडमधून आमदार म्हणून निवडून आले. येडीयुरप्पा मुख्यमंत्री झाल्यावर ते हवेरी जिल्ह्यातील शिगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडले गेले.
विनम्र लिंगायत समूहातून आलेल्या बसवराज हे व्यवसायाने मेकॅनिकल अभियंता आहेत. शेतीशी निगडित असल्याने कर्नाटकच्या सिंचनविषयक बाबींमध्ये ते जाणकार मानले जातात. राज्यात अनेक सिंचन प्रकल्प सुरू केल्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. आपल्या मतदारसंघात भारताचा पहिला 100% पाईप सिंचन प्रकल्प राबविण्याचे श्रेयही त्यांना जाते. त्यांचे वडील एसआर बोम्माई कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. 2008 मध्ये बसवराज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर पक्षात चढत राहिले. यापूर्वी ते राज्य सरकारमधील जलसंपदामंत्री राहिले आहेत. जनता दलातून त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरूवात केली.
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतल्याबद्दल बोम्मई यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेष्ठींच्या सूचनेनुसार येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सुमारे अर्धा डझन नेत्यांनी नवी दिल्लीपर्यंत लॉबिंग केले होते, मात्र येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय असणारे बसवराज बोम्मई यांना संधी देण्यात आली.