नवी दिल्ली : देशभरातील ओबीसींसाठी खूशखबर आहे. देशातील मेडिकल प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण लागू करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. त्यामुळे ओबीसींच्या मेडिकल क्षेत्रातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑल इंडिया कोटा अंतर्गत ओबीसींनी वैद्यकीय प्रवेशात एमबीबीएससह पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही आरक्षण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
देशातील वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण लागू करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे ओबीसींच्या वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऑल इंडिया कोटा अंतर्गत ओबीसांना वैद्यकीय प्रवेशात एमबीबीएससह पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही आरक्षण देण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. लवकरच त्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. सोमवारी (ता. 26) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण आणि आरोग्य मंत्रालयाची बैठक बोलावली होती. या बैठकीला विधी आणि सामाजिक न्याय विभागाशी संबंधित लोकही उपस्थित होते. यावेळी मोदींनी हे आदेश देतानाच आर्थिकदृष्ट्या कमकुवत (ESW) असलेल्या लोकांच्या आरक्षणावर काम करण्याचे निर्देश दिले.
सध्या 15 टक्के UG, 50 टक्के PG मेडिकल सीट राज्य सरकारांद्वारे ऑल इंडिया कोटानुसार मॅनेज केल्या जातात. त्यात एससी आणि एसटीसाठी जागा आरक्षित आहेत. मात्र, ओबीसींसाठी आरक्षित नाही, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं. यामध्ये ओबीसींनाही आरक्षण देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. हे प्रकरण कोर्टातही गेलं होतं. त्यामुळे कमीत कमी कालावधीत हा प्रश्न सोडवावा आणि कोर्टाच्याबाहेर यावर सहमती व्हावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले होते.
देशातील वैद्यकीय प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. वैद्यकीय प्रवेशात ओबीसी विद्यार्थ्यांना 27 टक्के आरक्षणाबाबत पंतप्रधानांनी केंद्रीय शिक्षण मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातील 700 ते 800 ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा होणार असून, देशभरात यामुळे हजारो ओबीसी विद्यार्थ्यांना लाभ होणार, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅाक्टर बबनराव तायवाडे यांनी माध्यमांना दिली आहे.