मुंबई : पोलिसांकडून क्लीन चीट नाहीच अश्लील चित्रपटांची निर्मिती आणि प्रसारणाच्या प्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी शिल्पाचीही चौकशी होत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चीट दिलेली नाही. तसंच सर्व दृष्टीकोन लक्षात घेऊन तपास केला जाणार आहे. या प्रकरणामध्ये सर्व खात्यांमधील व्यवहारांची तपासणी सुरु आहे, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, पोलिसांनी या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट दिली नाही. शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चीट देण्यात आलेली नाही असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या अधिकाऱ्यानं सांगितलं की, हा तपासाचा भाग असल्याने आणि अकाऊंटची तपासणी केली जात आहे. शिल्पा शेट्टीला अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. आमचा कोणाच्याही वैयक्तिक बँक अकाऊंटशी काही संबंध नाही.
कुंद्राचे बँक अकाऊंट आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिटर नियुक्त केलेत. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीशी संबंधित राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव आणि इतरांच्या बँक अकाऊंटची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक ऑडिटर्सना बोलविण्यात आलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राजच्या कंपनीवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. राजच्या कंपनीवर, हॉटशॉटवर तसेच गहना वशिष्ठ आणि आणखी 4 निर्मात्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मॉडेल आणि अभिनेत्रीने हा गुन्हा दाखल केला आहे. या मॉडेलने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिला मोठ्या सिनेमाचं लालच दाखवून एका अडल्ट सिनेमात काम करवून घेतलं होतं. यानंतर पोलिसांनी तिला एफआयआर दाखल करण्यास सांगितलं कारण ही घटना मालवणी परिसरात घडली होती.
* शिल्पाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या
पॉर्नोग्राफी कनेक्शन समोर आल्यापासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणी रोज नवे खुलासा समोर येत आहेत. राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पतीच्या अटकेनंतर शिल्पा सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहेत. फार कमी लोकांना माहिती आहे की, मध्यंतरी राज आणि शिल्पाच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या.
मी राज कुंद्राला घटस्फोट देत आहे…’ शिल्पाच्या फोनवरून असा मेसेज तिच्या आईला गेला होता. ज्यामुळे शिल्पाची आईला मोठा धक्का बसला. पण नंतर जेव्हा त्यांना खरी परिस्थिती कळाली तेव्हा त्यांना दिलासा मिळाला. खरं तर तेव्हा शिल्पासोबत एक प्रँक करण्यात आला. शिल्पासोबत हा प्रँक फिल्ममेकर अनुराग बासूने केला होता.
राज कुंद्रासोबत आपलं मोठं भांडण झालं असून लवकरचं त्याला घटस्फोट देत आहोत असं शिल्पा शेट्टीने आईला केलेल्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. ‘सुपर डान्सर 3’ मध्ये त्यांनी हा खुलासा केला. असं काही झालं आहे याची कल्पना देखील शिल्पाला नव्हती. पण नंतर गीता कपूरने तिला याबद्दल सांगितलं.
त्यानंतर शिल्पाने आईला फोन केला आणि सर्व काही खरं सांगितलं. ‘कधी माझ्या फोनवरून मी प्रेग्नेंट आहे किंवा घटस्फोट घेत आहे, असा मेसेज आला तर समजून जा हा एक प्रँक आहे. कारण अनुराग दादा सेटवर आहे.’ ‘सुपर डान्सर 3’ मध्ये अनुराग बासू, गीता कपूर आणि शिल्पा फार गंमत करायचे.