सोलापूर : माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्यावर प्रकृतीवर रुग्णालयातील वैद्यकीय पथक सजगपणे लक्ष ठेवून आहे. मंगळवारी व्हेंटीलेटर काढण्यात आले. रात्रभर बायपॅप मशीनद्वारे त्यांची श्वसनक्रिया सुरु आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके, श्वसनक्रिया, रक्तातील प्राणवायूचे प्रमाण नॉर्मल बनत चालले आहे.
मंगळवारी आबासाहेबांच्या प्रकृतीबाबत चुकीच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यामुळे चिंतेत अधीकच भर पडत होती. तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी या काळजीपोटी जागून काढली आहे.
सांगोला तालुक्यतील सर्व नागरिकांना, कार्यकर्त्यांना आणि जनतेला विनंती की, कोणत्या ही अफवांना बळी पडू नका,आबासाहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि बी पी नॉर्मल आहे. शेकापचे नेते भाई जयंत पाटील हे थोड्या वेळात सोलापूरला येत असून ते साहेबाना भेटतील आणि डॉक्टरांबरोबर चर्चा करणार आहेत. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे, काळजी करण्याचे कोणते ही कारण नाही तसेच आबासाहेब लवकर बरे व्हावेत म्हणून आपण सर्वांनी प्रार्थना करावी असेही आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उपचारांना ते हळूहळू चांगला प्रतिसाद देत आहेत, असे असले तरी त्यांची प्रकृती अद्याप धोक्याबाहेर नाही. जि. प. सदस्य सचिन देशमुख, लेबर फेडरेशनचे चेअरमन बाबा कारंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सोलापुरात मुक्कामी आहेत.
* शेकाप सरचिटणीस जयंत पाटील
सोलापुरात
शेकापचे सरचिटणीस तथा भाई जयंत पाटील आज बुधवारी सोलापुरात दाखल होत आहेत. सोबत माजी आमदार तथा शेकापचे नेते धैर्यशील पाटील हेही येत आहेत. मंगळवारी रात्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांच्यासह राज्यभरातील, जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी आबासाहेबांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे.
* आबासाहेब यांची प्रकृती स्थिर….
सांगोला तालुक्यातील सर्व नागरिकांना ,कार्यकर्त्यांना आणि जनतेला विनंती कि कोणत्या हि अफवांना बळी पडू नका साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि बी पी नॉर्मल आहे शे का प चे नेते भाई जयंत पाटील हे थोड्या वेळात सोलापूर ला
येत असून ते साहेबाना भेटतील आणि डॉ. बरोबर चर्चा करनार आहेत आम्ही हॉस्पिटल मध्ये आहे काळजी करन्याचे कोणते हि कारण नाही तसेच साहेब लवकर बरे व्हावेत म्हणून आपण सर्वांनी प्रार्थना करावी.
ॲड. सचिन देशमुख
जि. प. सदस्य सोलापूर