टोकियो : भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. सिंधुने चीनच्या बी बिंग जियोचा पराभव केला. सिंधूने जियोचा 21-13, 21-15 अशा फरकाने पराभव केला. या विजयासह सिंधूने कांस्य पदक जिंकले. दरम्यान, दोन ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला आणि दुसरी भारतीय व्यक्ती ठरली आहे.
पीव्ही सिंधूने चीनी ताइपेच्या खेळाडू विरुद्ध सेमीफायनलचा सामना गमावत सुवर्णपदकासह रौप्य पदक मिळवण्याची संधीही गमावली होती. मात्र तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात सिंधूने दमदार पुनरागमन करत सामना दोन सरळ सेट्समध्ये जिंकला. तिने जगातील सध्या 9 व्या क्रमांकावर असणाऱ्या ही बिंगजियाओ हिला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 ने नमवत कांस्य पदक पटकावलं.
ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत स्पर्धेत दोन पदक जिंकणारी सिंधू पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर दिग्गज पैलवान सुशील कुमारनंतर अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय ठरली आहे. सिंधूने याआधी 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवलं होतं. त्यानंतर यावर्षी कांस्यपदक मिळवत सिंधूच्या कारकिर्दीत आणखी रिकॉर्ड वाढले आहेत. याआधी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक पटकावले होते. त्यामुळे भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे दुसरं पदक असून बॉक्सर लवलीनानेही किमान कांस्य पदक निश्चित केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. भारताकडून ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक दोन पदके जिंकणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. या कामगिरीबद्दल तिचे हार्दीक अभिनंदन ! P V Sindhu #Tokyo2020 असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोशल मिडीयावर शुभेच्छा दिल्या आहेत.
टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने कांस्यपदक पटकावले. सिंधूने सामना जिंकल्यावर भावनिक प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, सध्या माझा आनंद गगनात मावत नाहीये. मी खूप वर्षांपासून प्रचंड मेहनत घेत आहे. मला असं वाटतं की आज मी छान खेळले. खेळताना मला खूप दडपण होतं पण मी शांत राहिले आणि माझा खेळ करत राहिले. भारतीय चाहत्यांनीही माझ्यावर खूप प्रेम केलंय. त्यांचेही धन्यवाद.
भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूला शनिवारी (31 जुलै) उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. आज रविवारी (1 ऑगस्ट) ती चीनच्या ही बिंग जियाओविरुद्ध कांस्यपदकासाठी दोन हात केले. गतविजेत्या सिंधूचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न उपांत्य फेरीतील पराभवामुळे भंगले, तिने यंदा करुन दाखवले. कांस्यपदक जिंकण्याची संधी तिने हुकवली नाही.
या सामन्यापूर्वी सिंधूच्या वडिलांनी तिला खास संदेश दिला होता. पी.व्ही. रमण्णा म्हणाले की, सिंधूने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ताई त्झू यिंगविरुद्धचा वेदनादायक पराभव विसरून कांस्य पदकाचा सामना खेळला पाहिजे. सामन्यावर ताईने पूर्ण ताबा मिळवला होता. ती देखील ऑलिम्पिक पदक आणि जागतिक अजिंक्यपद जिंकण्यासाठी उत्सुक आहे. अनेकवेळा पहिल्या क्रमांकावर राहूनही ती आतापर्यंत हे करू शकलेली नाही. जागतिक विजेती सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याची संधी गमावली. विशेष गोष्ट म्हणजे गेल्या पाच वर्षात सिंधूने सर्व प्रमुख स्पर्धांचे जेतेपद पटकावले आहे. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्य पदक पटकावले होते.
* ऑस्ट्रेलियाच्या एम्मा मॅककॉनने इतिहास रचला, ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली
ऑस्ट्रेलियाच्या 27 वर्षीय महिला जलतरणपटू एम्मा मॅककॉनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 4×100 पदक रिलेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयासह एम्माने तिचे ऐतिहासिक सातवे जलतरण पदक जिंकले. एकाच खेळात सात पदके जिंकणारी ती पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. यासह, मॅककॉन एका ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी दुसरी महिला ठरली.