पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९९.६३ टक्के एवढा लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालात ८.९७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबाद या विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी हा निकाल जाहीर केला. विज्ञान शाखेचा ९९.४५ टक्के, कला शाखेचा ९९.८३ टक्के आणि वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी चार वाजता ऑनलाईन हा निकाल पाहता येणार आहे.
इथे पाहा निकाल
https://hscresult.11thadmission.org.in
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा देते. विद्यार्थ्यांनी भविष्यात महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, असं आवाहन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासूनच बारावीचा निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. आता पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल जाहीर केला आहे. आज दुपारी १२ वाजता निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम परीक्षांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आला आहे कारण जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सीबीएसईचे १०वीचे ९९.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दहावीच्या २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. परीक्षा रद्द झाल्यामुळे, विद्यार्थ्यांचे त्यांच्या वर्षभराच्या कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केले गेले आहे. ज्यात प्रॅक्टिकल, युनिट टेस्ट, प्री-बोर्ड, मिड टर्म यांचा समावेश आहे. पहिल्यांदाच बोर्ड परीक्षेशिवाय दहावीचे निकाल जाहीर करत आहे. त्यामुळे निकालाची टक्केवारी वाढली आहे.
गेल्या वर्षी, एकूण १८ लाख ८५ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १७ लाख १३ हजार १२१ विद्यार्थ्यांनी १० वीची परीक्षा ९१.४६ टक्क्यांसह उत्तीर्ण केली. सीबीएसईने “नापास” शब्दाऐवजी “Essential Repeat” चा वापर विद्यार्थ्यांच्या निकालावर केला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या निकालांवर नापास शब्दाचा उल्लेख केला जाणार नाही.
# कोणत्या शाखेचा निकाल किती?
* विज्ञान – 99.45 टक्के,
* कला – 99.83 टक्के,
* वाणिज्य 99.81 टक्के,
एमसीव्हीसी – 98.8 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
किती विद्यार्थ्यांना किती गुण?
* 12 विद्यार्थ्यांना- 35 टक्के
* 91, 435 विद्यार्थ्यांना- 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण
* 1372 विद्यार्थ्यांना- 95 टक्के किंवा त्याहून अधिक गुण
* 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.